शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगरमध्ये बर्निंग नॅनोने काळजाचा थरकाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 00:45 IST

राणेनगर येथील समांतर रस्त्यावर जात असलेल्या नॅनो कारने अचानक पेट घेतल्याची घटना शुक्रवारी (दि़२१) सकाळच्या सुमारास घडली़ सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांसमोर झालेल्या या बर्निंग नॅनो कारमुळे त्यांच्या काळजाचा थरकाप झाला होता़ दरम्यान, परिसरातील नागरिकांनी नॅनोला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत कारचा केवळ सांगाडाच शिल्लक राहिला़

इंदिरानगर : राणेनगर येथील समांतर रस्त्यावर जात असलेल्या नॅनो कारने अचानक पेट घेतल्याची घटना शुक्रवारी (दि़२१) सकाळच्या सुमारास घडली़ सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांसमोर झालेल्या या बर्निंग नॅनो कारमुळे त्यांच्या काळजाचा थरकाप झाला होता़ दरम्यान, परिसरातील नागरिकांनी नॅनोला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत कारचा केवळ सांगाडाच शिल्लक राहिला़  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ७ वाजेच्या सुमारास श्रीजयनगरमधील वृंदावन सोसायटीतील नरेंद्र सौंदाणकर (४६ ) हे नेहमीप्रमाणे नॅनो कारमधून (एमएच १४ डीए ५७७०) राणेनगरकडून समांतर रस्त्याने पाथर्डी फाट्याकडे जात होते़ त्यांच्या कारला पाठीमागून आग लागलेली होती, मात्र त्यांच्या लक्षात न आल्याने ते जात होते़ हा प्रकार लक्षात येताच नागरिकांनी त्यांना थांबवीत कारला आग लागल्याचे सांगितले़ यानंतर सौंदाणकर तातडीने कारच्या खाली उतरले अग्निशमन विभागास घटनेची माहिती दिली़या दरम्यान नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला़ यानतर सिडकोच्या अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी पोहोचला व त्यांनी आग आटोक्यात आणली़ मात्र, उशीर झाल्याने या नॅनो कारचा केवळ सांगाडाच शिल्लक राहिला होता़ शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, या घटनेची इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

टॅग्स :Fairजत्राcarकारNashikनाशिक