शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगरमध्ये ‘बर्निंग नॅनो’ने उडाला काळजाचा थरकाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:37 IST

राणेनगर येथील समांतर रस्त्यावर जात असलेल्या नॅनो कारने अचानक पेट घेतल्याची घटना शुक्रवारी (दि़२१) सकाळच्या सुमारास घडली़ सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांसमोर झालेल्या या बर्निंग नॅनो कारमुळे त्यांच्या काळजाचा थरकाप झाला होता़

इंदिरानगर : राणेनगर येथील समांतर रस्त्यावर जात असलेल्या नॅनो कारने अचानक पेट घेतल्याची घटना शुक्रवारी (दि़२१) सकाळच्या सुमारास घडली़ सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांसमोर झालेल्या या बर्निंग नॅनो कारमुळे त्यांच्या काळजाचा थरकाप झाला होता़ दरम्यान, परिसरातील नागरिकांनी नॅनोला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत कारचा केवळ सांगाडाच शिल्लक राहिला़  सकाळी ७ वाजेच्या सुमारास श्रीजयनगरमधील वृंदावन सोसायटीतील नरेंद्र सौंदाणकर (४६ ) हे नेहमीप्रमाणे नॅनो कारमधून (एमएच १४ डीए ५७७०) राणेनगरकडून समांतर रस्त्याने पाथर्डी फाट्याकडे जात होते़ त्यांच्या कारला पाठीमागून आग लागलेली होती, मात्र त्यांच्या लक्षात न आल्याने ते जात होते़ हा प्रकार लक्षात येताच नागरिकांनी त्यांना थांबवीत कारला आग लागल्याचे सांगितले़ यानंतर सौंदाणकर तातडीने कारच्या खाली उतरले अग्निशमन विभागास घटनेची माहिती दिली़या दरम्यान नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला़ यानतर सिडकोच्या अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी पोहोचला व त्यांनी आग आटोक्यात आणली़ मात्र, उशीर झाल्याने या नॅनो कारचा केवळ सांगाडाच शिल्लक राहिला होता़ शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, या घटनेची इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

टॅग्स :Fairजत्राcarकारNashikनाशिक