शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल टाकून मित्राच्या पत्नीला जाळले : महिला ९० टक्के भाजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 17:08 IST

या घटनेत रेखा बाळू मोरे ही (३२) सुमारे ९० टक्के भाजली तर तिला जाळणारा तिचा मानलेला भाऊ व पतीचा मित्र संशियत आरोपी रविंद्र नाना भामरे देखील दहा टक्के भाजला आहे. भामरे याने रेखाला जाळल्यानंतर औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देरेखा व रविंद्र यांच्यात शाब्दिक वाद झाले जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा

पंचवटी : गेल्या अनेक वर्षांपासून मित्राकडे राहणार्या मित्राने मित्राच्याच पत्नीवर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळल्याची घटना रविवारी (दि.३१) सकाळच्या सुमाराला पंचवटीतील कृष्णनगर परीसरात असलेल्या हरी सिद्धी अपार्टमेंट येथे घडली आहे.

या घटनेत रेखा बाळू मोरे ही (३२) सुमारे ९० टक्के भाजली तर तिला जाळणारा तिचा मानलेला भाऊ व पतीचा मित्र संशियत आरोपी रविंद्र नाना भामरे देखील दहा टक्के भाजला आहे. भामरे याने रेखाला जाळल्यानंतर औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनेत भाजलेल्या रेखाला खाजगी तर भामरेला जिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात असून सकाळी भरवस्तीत घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, कृष्णनगर येथिल हरी सिद्धी अपार्टमेंट येथे फ्लॅट क्रमांक ७ मध्ये बाळू मोरे पत्नी रेखा मुलगी सायली तसेच बायकोचा मानलेला भाऊ व मित्र रविंद्र भामरे समवेत गेल्या अनेक वर्षांपासून राहतात. मोरे हा खाजगी नोकरी करतो तर पत्नी घरकाम करते आण िमुलगी सायली सारडा शाळेत सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. गणेशवाडी शेरी मळ्यात राहणारा भामरे मिसळपाव गाडी लावतो. शनिवारी रात्री रेखा व तिचा मानलेला भाऊ भामरे यांच्यात एकत्र राहण्यावरून वाद झाले त्यानंतर रविवारी सकाळी रेखाचा पती बाळू हा कामासाठी बाहेर गेला त्यानंतर पुन्हा रेखा व रविंद्र यांच्यात शाब्दिक वाद झाले त्यावेळी घरात असलेली मुलगी सायली बाथरूम मध्ये होती त्यानंतर भामरे याने बेडरूम असलेल्या रेखा हिच्यावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले व तो टेरेसमध्ये येऊन थांबला त्यावेळी आवाज झाल्याने मुलगी घाबरून घराबाहेर पळाली काही वेळाने घरातून धूर निघत असल्याने नागरिकांनी अिग्नशमन दलाला माहिती कळविली त्यानंतर अिग्नशमन दलाच्या जवानांनी व नागरिकांनी घराचा दरवाजा तोडला व घरात लागलेली आग विझविली त्यावेळी रेखा गंभीर भाजली होती तर भामरे याने देखील काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनास्थळी पंचवटी पोलीसपोहचले त्यांनी नागरिकांच्या मदतीने रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेचे वृत्त समजताच घटनास्थळी पोलिस निरीक्षक कैलास पाटील, रघुनाथ शेगर, कैलास पाटील, सारिका अिहरराव, पोलिस उपनिरीक्षक आश्विनी मोरे, योगेश उबाळे आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटनेबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Nashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलPoliceपोलिसAccidentअपघात