शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 00:25 IST

धार्मिक सण-उत्सवांमुळे मागील दहा ते बारा दिवसांपासून पोलीस प्रशासनावर बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण निर्माण झाला असताना दुसरीकडे मात्र शहरात घरफोड्या, दुचाकीचोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. सातपूर, उपनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या दोन घटनांमध्ये भामट्यांनी तब्बल ४ लाख ५७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच ३५ हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.

ठळक मुद्देगुन्हेगार मोकाट ; साडेचार लाखांचा ऐवज लुटला

नाशिक : धार्मिक सण-उत्सवांमुळे मागील दहा ते बारा दिवसांपासून पोलीस प्रशासनावर बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण निर्माण झाला असताना दुसरीकडे मात्र शहरात घरफोड्या, दुचाकीचोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. सातपूर, उपनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या दोन घटनांमध्ये भामट्यांनी तब्बल ४ लाख ५७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच ३५ हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.शहर व परिसरात ऐन गणेशोत्सवात गुन्हेगारीने डोके वर काढले. सोनसाखळी चोरीच्या घटनांपासून घरफोड्यांपर्यंत गुन्हे घडत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गणेशोत्सवात चोख पोलीस बंदोबस्तामुळे हजारो पोलीस रस्त्यावर होते. तसेच वाहने साततत्याने गस्तीवर असतानाही चोरट्यांनी सोनसाखळी चोरीचे धाडस केले. डीजीपीनगर क्रमांक-१मधील मंगलमूर्ती अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या आश्विनी भोसले (३३) यांची सदनिका अनंत चतुर्दशीच्या दिवशी भरदुपारी २ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केली. बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ४ लाख १३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केला. या प्रकरणी भोसले यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसºया घटनेत प्रबुद्धनगर येथील एका पीठ गिरणीच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ३५ हजार ५०० रुपयांची रोकड, ९ हजार रुपये किमतीच्या तीन चांदीच्या मूर्ती असा एकूण ४४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केल्याची घटना घडली. या प्रकरणी प्रशांत उद्धव भोसले यांनी सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.शहरात पुन्हा चोरट्यांची टोळी सक्रिय झाली असून, ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू असतानाही चोरटे सर्रासपणे भरदिवसा बंद घरांचे कुलूप तोडून हजारो ते लाखो रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा करत असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.गणेशोत्सव काळात असे घडले गुन्हेसातपूर, पंचवटी, आडगाव येथे खुनाचा प्रयत्नइंदिरानगरला दोन तर म्हसरूळ, सातपूर पोलीस ठाणे हद्दीत तीन सोनसाखळ्या चोरीपंचवटी, सातपूर, मुंबई नाका हद्दीत जबरी चोरीअंबड, इंदिरानगर, उपनगर, पंचवटी, सातपूर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडीच्या घटना

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtheftचोरी