सातपूरला घरफोडी, ७७ हजाराचा ऐवज चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:10 IST2021-06-19T04:10:55+5:302021-06-19T04:10:55+5:30

नाशिक : सातपूरच्या अशोकनगर जाधव संकुल भागातील शिताई हाऊसिंग सोसायटीत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ७७ हजारांचा ऐवज चोरून ...

Burglary in Satpur, theft of Rs 77,000 | सातपूरला घरफोडी, ७७ हजाराचा ऐवज चोरी

सातपूरला घरफोडी, ७७ हजाराचा ऐवज चोरी

नाशिक : सातपूरच्या अशोकनगर जाधव संकुल भागातील शिताई हाऊसिंग सोसायटीत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ७७ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलाकर वाल्मीक बाविस्कर यांच्या घराच्या दरवाज्याचा कडीकोयंडा अज्ञात इसमाने तोडून घरात प्रवेश केला, घरात हॉलमध्ये ठेवलेल्या लोखंडी कपाटातील लॉकर तोडून २५ हजार रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस, १२ हजार ५०० रुपयांची सोन्याची अंगठी, २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, १२ हजार ५०० रुपयांची कर्णफुले आदी दागिन्यांसह दोन हजार रुपये किमतीची शिलाई मशीन चोरी करून नेली. याप्रकरणी कमलाकर बाविस्कर यांनी सातपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Burglary in Satpur, theft of Rs 77,000