शरणपूर रोडला घरफोडीत २१ हजारांचा ऐवज लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:11 IST2021-07-22T04:11:17+5:302021-07-22T04:11:17+5:30
--- सराफ बाजारातील आंदोलन भोवले नाशिक : सराफ बाजारात जमाव गोळा करून, विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात सुवर्णकार ...

शरणपूर रोडला घरफोडीत २१ हजारांचा ऐवज लांबविला
---
सराफ बाजारातील आंदोलन भोवले
नाशिक : सराफ बाजारात जमाव गोळा करून, विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात सुवर्णकार समाजाच्या आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित सुनील एकनाथ महालकर, विनोद सुभाष थोरात, राजेंद्र बाळकृष्ण सहाणे, राजेंद्र जयराम कुलथे, किशोर गोपाळराव घाेडके, प्रमोद दत्तात्रय कुलथे आदींनी मंगळवारी (दि.२०) सकाळच्या सुमारास विनापरवानगी आंदोलन केले. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शहरात जमावबंदी आदेश लागू आहे, तरीही आंदोलकांनी विनापरवानगी आंदोलन केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
--
वासननगरला वृद्धाची आत्महत्या
नाशिक : पाथर्डी फाटा येथील वासननगर परिसरातील रहिवासी धनसुखलालजी मनोराज बोथरा (७१) यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याचे आढळून आले. बोथरा यांनी गळफास घेतल्याचे मंगळवारी (दि.२०) दुपारी उघडकीस आले. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
--
पळसेला ३५ वर्षीय महिलेची आत्महत्या
नाशिक : पळसे भागात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेने राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केली. ज्योती मालोजी गायधनी असे या महिलेचे नाव आहे. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू हाेते. मात्र, उपचार सुरू असताना, मंगळवारी (दि.२०) त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.