मालेगावी नयापुऱ्यात घरफोडी; तिघांना अटक
By Admin | Updated: June 9, 2014 00:37 IST2014-06-09T00:35:50+5:302014-06-09T00:37:27+5:30
मालेगावी नयापुऱ्यात घरफोडी; तिघांना अटक

मालेगावी नयापुऱ्यात घरफोडी; तिघांना अटक
मालेगाव : शहरातील नयापुरा भागात फत्तेह मैदान येथील एका घरातुन घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागदागिने व रोख रक्कम असा २ लाख ३१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या तिघांना आझादनगर पोलीसांनी अटक केली. गेल्या शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.तिघांनी एकबाल अहमद यांच्या घराच्या पाठीमागील भिंतीने गच्चीवर चढून घरात जाण्यासाठी असलेल्या जिन्याच्या दरवाजाची कडी उघडून आत प्रवेश केला. घरात ठेवलेल्या लोखंडी पेटी व कपाटातील सोन्या-चांदीचे
दागिने, असा एकूण दोन लाख ३१ हजार ५०० रुपयांचा माल चोरून नेला.
याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अजय वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक खडांगळे करीत आहेत.