दाभाडी येथे घरफोडी
By Admin | Updated: August 5, 2016 00:26 IST2016-08-05T00:26:19+5:302016-08-05T00:26:29+5:30
दाभाडी येथे घरफोडी

दाभाडी येथे घरफोडी
दाभाडी : परिसरात एकाच रात्री दोन दुकाने फोडण्यात आली असून, ग्रामस्थांत घबराट पसरली आहे. छावणी पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पहाटे २ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी रस्त्यालगतच्या क्रांती फोटो स्टुडिओतून कॅमेरे, पेनड्राईव्हसह सुमारे सव्वा लाखाचा ऐवज चोरून नेला. भावसार किराणा दुकानातून नऊ हजार ८०० रुपयांची रोकड व भुसार माल चोरून नेला.
मेनरोडवरील राजस मेडिकलचे शटर चोरट्यांनी उघडले मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. भरवस्तीत झालेल्या चोऱ्यांमुळे ग्रामस्थात घबराट पसरली आहे. छावणीच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट घेऊन पाहणी केली. (वार्ताहर)