अश्विननगरमध्ये घरफोडी; दागिने लंपास
By Admin | Updated: September 15, 2015 22:25 IST2015-09-15T22:24:58+5:302015-09-15T22:25:39+5:30
अश्विननगरमध्ये घरफोडी; दागिने लंपास

अश्विननगरमध्ये घरफोडी; दागिने लंपास
नाशिक : सिडकोतील अश्विननगरमध्ये घरफोडी करून दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे़
चैत्रपालवी अपार्टमेंटमध्ये राहणारे अमित चंद्रकांत पळसुले हे ३ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर या कालावधीत बाहेरगावी गेले होते़ या काळात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरातील ६८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम व इतर साहित्य चोरून नेले़ पळसुले यांनी दिलेल्या फि र्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़