आडगाव शिवारातील वृंदावननगरमध्ये घरफोडी
By Admin | Updated: September 11, 2015 23:16 IST2015-09-11T23:13:28+5:302015-09-11T23:16:26+5:30
आडगाव शिवारातील वृंदावननगरमध्ये घरफोडी

आडगाव शिवारातील वृंदावननगरमध्ये घरफोडी
नाशिक : टेरेसच्या दरवाजातून प्रवेश करून सुमारे पंचवीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना नांदूर नाका परिसरात घडली आहे़
वृंदावननगरमधील शामल रो-हाऊसमध्ये किरण परशराम पवार राहतात़ सोमवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्या घराच्या टेरेसच्या उघड्या दरवाजातून चोरट्यांनी प्रवेश करून बैठक कक्षातून दोन मोबाइल फोन व एलईडी टीव्ही असा चोवीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ या प्रकरणी किरण पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात
आला आहे़ (प्रतिनिधी)