सिडकोतील सिंहस्थनगरमध्ये घरफोडी
By Admin | Updated: November 7, 2015 21:39 IST2015-11-07T21:37:04+5:302015-11-07T21:39:18+5:30
सिडकोतील सिंहस्थनगरमध्ये घरफोडी

सिडकोतील सिंहस्थनगरमध्ये घरफोडी
नाशिक : बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह मोबाइल लंपास केल्याची घटना सिडकोतील सिंहस्थनगरमध्ये गुरुवारी (दि़५) दुपारच्या सुमारास घडली़ नंदकिशोर प्रल्हाद कोष्टी हे दुपारच्या सुमारास बाहेर गेले होते़
या कालावधीत चोरट्यांनी घरात प्रवेश करून लाकडी शोकेसमधील सोन्याचे दागिने व सॅमसंग कंपनीचा मोबाइल असा एकूण ३९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ याप्रकरणी कोष्टी यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात
घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
बसप्रवासात रोकड लंपास
बसप्रवासात प्रवाशाच्या खिशातील पंचवीस हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना शुक्रवारी घडली़ श्रावण लक्ष्मण रुपवते हे आंबेडकरनगर येथून काठेगल्लीपर्यंत बसने आले असता चोरट्यांनी खिशातून रोकड चोरली.