शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीत सोन्याच्या दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 00:54 IST

घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा १९ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना कार्बन नाका परिसरात घडली आहे़

नाशिक : घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा १९ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना कार्बन नाका परिसरात घडली आहे़  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ९ ते १२ डिसेंबर या कालावधीत चोरट्यांनी राजेंद्र चव्हाण (रूम नंबर २४८१, संकल्प हॉस्पिटलमागे) यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला़ तसेच घरातील ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप, ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे १२ मणी व पाच हजार रुपयांची रोकड असा १९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महिलेची आत्महत्यापाथर्डी फाट्यावरील स्वराजनगरमधील वृद्धेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ दुर्गा सुरेश जाधव (६०, रा. नरहरी लॉन्सजवळ, स्वराजनगर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे़ १३ डिसेंबर रोजी सायंकाळी दुर्गा जाधव यांनी विषारी औषध सेवन केले होते़ ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.सातपूरच्या शिवाजीनगरमधील अहिल्याबाई होळकर चौकातील अक्षय राजपूत यांची २० हजार रुपये किमतीची डिस्कव्हर दुचाकी (एमएच १५, सीझेड १२०१) चोरट्यांनी घराजवळून चोरून नेली़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गंजमाळला तरुणास मारहाणकुरापत काढून गंजमाळ परिसरातील युवकास चार-पाच संशयितांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि़१८) रात्रीच्या सुमारास म्हसोबा मंदिराजवळ घडली़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बंटी गोरख सूर्यवंशी (२१, रा. म्हसोबा मंदिराजवळ, भीमवाडी, गंजमाळ) यास मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास संशयित रोहित ज्ञानेश्वर सोळसे, सागर ज्ञानेश्वर सोळसे व त्यांचे दोन मित्र (सर्व रा. भीमवाडी, गंजमाळ) यांनी अडवून कुरापत काढून कटर गालावर मारून दुखापत केली़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.केवडीबनातून दुचाकीची चोरीकेवडीबनातील हिना उद्योगजवळील रहिवासी ज्ञानेश्वर कोकाटे यांची दुचाकी (एमएच १५, एव्ही १६५२) व दोन हजार रुपये किमतीचा लिनोव्हो मोबाइल चोरट्यांनी राहत्या घराजवळून चोरून नेला़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कार्बन नाका भागातून दुचाकीची चोरीसातपूरच्या कार्बन नाका भागातील संकल्प हॉस्पिटलच्या समोरून चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी