धात्रक फाटा परिसरात घरफोडी
By Admin | Updated: May 17, 2017 18:20 IST2017-05-17T18:20:04+5:302017-05-17T18:20:04+5:30
धात्रक फाटा परिसरात बंद घराच्या खिडकीचे गज वाकवून घरफोडी झाल्याची घटना घडली

धात्रक फाटा परिसरात घरफोडी
नाशिक : धात्रक फाटा परिसरात बंद घराच्या खिडकीचे गज वाकवून घरफोडी झाल्याची घटना घडली असून, चोरट्यांनी घरातील रोकड व सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे ६७ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.
धात्रक फाटा परिसरातील सिद्धिविनायक रोहाउसमधील रहिवासी श्रीधर गोपाळ कुलकर्णी (६३) यांनी याप्रकरणी तक्र ार दाखल केली आहे. कुलकर्णी कुटुंबीय शनिवारपासून (दि. १३) बाहेरगावी गेले होते. ते मंगळवारी (दि. १६) घरी परतले असता त्यांच्या ही घटना लक्षात आल्याने कुलकर्णी कुटुंबीयांना धक्काच बसला. त्यांनी तत्काळ म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, अज्ञात चोरट्यांनी बंद रोहाउसच्या खिडकीचे गज वाकवून घरात प्रवेश केला व कपाटातील ४७ हजार ५०० रुपयांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे ६७ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे.