- विजय मोरे नाशिक : मद्यसेवनाचे खोटे कारण दाखवून विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करणाºया एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कंपनीस ग्राहक न्यायालयाने दणका दिला आहे. विमा धारकास अपघातात कायमचे अपंगत्व आल्याने पाच लाख व उपचारासाठी एक लाख अशी सहा लाखांची भरपाई देण्याचे आदेश नाशिकच्या ग्राहक न्यायालयाचे न्यायाधीश मिलिंद सोनवणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिले आहेत़विमाधारक प्रवीण बबन गणोरे यांना चेतन पावडे याने १५ मार्च २०१७ रोजी रात्री शिवीगाळ व धक्काबुकी करून ३० फूट खोल पाटात फेकून दिले होते.गंभीर जखमी झालेल्या गणोरे यांच्यावर सिंफनी हॉस्पिटलमध्ये शस्त्रकिया करण्यात आली़ त्यांचा जीव वाचला मात्र कायमचे अपंगत्व आले. गणोरे यांनी कंपनीकडे कायमच्या अपंगत्वासाठी ५ लाख, उपचारासाठी एक लाख व कर्ज सुरक्षेसाठी ३ लाख ४४ हजार ७७२ रुपयांच्या विम्यासाठी दावा केला. मात्र कंपनीने ते मद्याच्या नशेत असल्याचे खोटे कारण दाखवून विम्याचा दावा नामंजूर केला़ गणोरे यांनी अॅड़ एम़ एस़ आंबाडे यांच्यामार्फत ग्राहक न्यायालयात दावा दाखल केला होता़ विमा कंपनीने कोणताही पुरावा नसताना डॉ़ देसाई यांचे डिस्चार्ज कार्डवरील हिस्टरी आॅफ अल्कोहोल कन्झम्पशन असा रिमार्क पाहून जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न असल्याचे समोर आले़मी अजूनही बेडवर असून न्यायालयाचे आदेश विमा कंपनीकडे मेल व कुरियरने पाठविले आहेत. मात्र अद्यापपर्यंत विम्याची रक्कम मिळाली नसून पाठपुरावा सुरू आहे़ - प्रवीण गणोरे, विमाधारक
मद्यसेवनाचे कारण देत विमा रक्कम नाकारणाऱ्या कंपनीस दणका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 02:22 IST