नाशिक : गंगापूररोडवरील आनंदवली येथील नवश्या गणपतीनगर भागात चोरट्यांनी घरफोडी करून ४९ हजार रुपयांच्या मुद्देमालासह महत्त्वाचे कागदपत्र चोरून नेले आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आहे.आनंदवल्ली भागातील नवश्या गणपतीनगरमधील रहिवासी नरेंद्र खंडू पाटकर यांच्या बंगल्यात चोरट्यांनी दि. २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०१८ या कालावधीत किचनच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला.
आनंदवलीत बंगल्याचे गज कापून घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 01:26 IST