शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

गुंडगिरी फोफावतेय : वडाळागावात संशयिताने फायटरने फोडली युवकाची हनुवटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 13:12 IST

इंदिरानगर : दुचाकीला रिक्षाचा कट लागला आणि फिर्यादी मोहम्मद ओवेस कोकणी (१९)व रिक्षाचालकाची बाचाबाची झाली रिक्षाचालक तेथून निघून गेला; मात्र याचवेळी संशयित अकिल पिरमोहम्मद शेख व संशयित सराईत शौकत सुपडू शहा हे दोघे आले व त्यांनी ओवेस व त्याचा मित्र जलालला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी शौकत याने फायटरने ...

ठळक मुद्दे पोलीस चौकीत ‘अर्थ’पूर्ण व्यवहारज्या रिक्षाचालकासोबत वाद झाला तो एका संशयिताचा दाजी असल्याचे समजते.मोहम्मदची हनुवटी फूटल्याने रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळला.

इंदिरानगर : दुचाकीला रिक्षाचा कट लागला आणि फिर्यादी मोहम्मद ओवेस कोकणी (१९)व रिक्षाचालकाची बाचाबाची झाली रिक्षाचालक तेथून निघून गेला; मात्र याचवेळी संशयित अकिल पिरमोहम्मद शेख व संशयित सराईत शौकत सुपडू शहा हे दोघे आले व त्यांनी ओवेस व त्याचा मित्र जलालला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी शौकत याने फायटरने मोहम्मदची हनुवटी फोडल्याचा प्रकार वडाळागावात उघडकीस आला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वडाळागाव परिसरातील खंडोबा चौक हा मुख्य चौक म्हणून ओळखला जातो. या चौकापासून काही मीटरवर वडाळा पोलीस चौकी आहे; मात्र ही चौकी असून नसल्यासारखी झाली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी (दि.९) येथील एका हॉटेलसमोर फिर्यादी ओवेस व जलाल हे दोघे चहा पिण्यासाठी संध्याकाळी आले होते. यावेळी संशयितांनी ‘तु माझ्या बहिणीला शिवीगाळ का केली’ असा प्रश्न उपस्थित करत मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी बंटी याने रिंगपाणा व शौकतने फायटरचा वापर करत दोघांना गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मोहम्मदची हनुवटी फूटल्याने रक्तबंबाळ झाला व बेशूध्द होऊन जमिनीवर कोसळला. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. घटनेची माहिती त्याचे वडील ओवेस यांना समजताच ते म्हशीच्या गोठ्यावरून तत्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी जखमी अवस्थेत मुलाला उचलून खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी संशयितांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ज्या रिक्षाचालकासोबत वाद झाला तो एका संशयिताचा दाजी असल्याचे समजते. या घटनेवरून पुन्हा गुन्हेगारी घटनांनी वडाळागावात डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. संशयित शौकतवर यापुर्वीदेखील गुन्हे दाखल आहे. तसेच बंटी शेख याची पार्श्वभूमीदेखील गुन्हेगारी स्वरूपाची आहे. या दोघा सराईत गुन्हेगारांवर यापुर्वी विविध प्रकरचे गुन्हे इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी संशयितांविरूध्द गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.पोलीस चौकीत ‘अर्थ’पूर्ण व्यवहारवडाळा पोलीस चौकी नावालाच उरली आहे. चौकीचे कुलूप अल्पवेळ उघडते. या चौकीत तक्रारींचा निपटारा कमी अन् ‘अर्थ’पूर्ण व्यवहार अधिक होत असल्याचे नागरिकांनी बोलून दाखविले. वडाळा पोलीस चौकीचे सक्षमीकरण करणे गरजेचे असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय