टाकळीतील गुंडगिरी नागरिक भयभीत
By Admin | Updated: November 24, 2015 22:48 IST2015-11-24T22:47:59+5:302015-11-24T22:48:47+5:30
महिलांचे निवेदन : कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न

टाकळीतील गुंडगिरी नागरिक भयभीत
टाकळीतील गुंडगिरी
नागरिक भयभीतमहिलांचे निवेदन : कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नउपनगर : आगरटाकळी परिसरातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेबाबत उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्यासमोर रहिवाशांनी समस्यांचा पाढाच वाचला.
आगरटाकळी परिसरातील निर्माण झालेल्या कायदा-सुव्यवस्थेबाबत उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत व इतर अधिकाऱ्यांनी आगरटाकळी परिसरात चौकाचौकात रहिवासी, महिलांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी रहिवाशांनी उत्तरानगर, साईसंजीवनीनगर आरटीओ कॉलनी, तपोवनरोड, स्प्रिंग व्हॅली परिसर, बोधलेनगर, ड्रीमसिटी परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी कारवायांनी डोके वर काढल्याने नागरिकांनी असुरक्षितेची भावना व्यक्त केली. घरफोडी, चेनस्नॅचिंग, दगडफेक, वाहनांची मोडफोड, जाळपोळ, पेट्रोलचोरी, टवाळखोरी, छेडछाडीच्या प्रकारांबाबत महिलांनी चिंता व्यक्त करून सायंकाळनंतर घराबाहेर पडणेदेखील धोकादायक वाटू लागल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले. तपोवनरोड परिसरात पोलीस चौकी उभारून आगरटाकळी भागात दिवस-रात्र पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी आशिष साबळे, धीरज शिंदे, सागर धर्माधिकारी, प्रवीण महाजन, उदय जोशी, अश्विनी भट, विद्या साबळे, पुष्पा बाटे, मीनाक्षी दळवी आदि उपस्थित
होते. (वार्ताहर)