नाशिक : सराफ बाजारात पाळण्यात आलेल्या ऐच्छिक बंदनंतर बाजार पुन्हा एकदा बहरला आहे. सराफा बाजारातील सर्व दुकाने खुली झाल्याने येथील व्यवहाला चालना मिळाली आहे. सराफ बाजार पुन्हा एकदा सुरू करण्यात आला असला तरी सुरक्षिततेच्या नियमांच्या अंमलबजावणीची काळजी घेतली जात असल्याने सराफा असोसिएशनच्या वतीने कळविण्यात आले आहे. सुरक्षित अंतर, सॅनिटाझर, तसेच चेहऱ्याला मास्क लावण्याची दक्षता घेत येथील व्यवहार पूर्वपदावर आले आहेत.. दालनातील खरेदीसह गर्दी टाळून सुरक्षित सोने खरेदीसाठी सराफ असोसिएशनातर्फे ग्राहकांसाठी विविध पर्यायदेखील उपलब्ध करून देण्यात येत आले आहेत.
सराफ बाजार पुन्हा गजबजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 00:28 IST