समृद्धी महामार्गालगतच बुलेट ट्रेनचे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:46 IST2021-02-05T05:46:58+5:302021-02-05T05:46:58+5:30
समृद्धी महामार्गाला जवळूनच बुलेट ट्रेन नेण्याचा विचार असल्याने पुन्हा भूसंपादन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गापाठोपाठ आता बुलेट ट्रेनही ...

समृद्धी महामार्गालगतच बुलेट ट्रेनचे सर्वेक्षण
समृद्धी महामार्गाला जवळूनच बुलेट ट्रेन नेण्याचा विचार असल्याने पुन्हा भूसंपादन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गापाठोपाठ आता बुलेट ट्रेनही साकारली जाणार असल्याने इगतपुरी तालुक्यातील महामार्गालगतच्या शेतकऱ्यांमध्ये विरोधाचा सूर उमटू लागला आहे. मुंबई-नागपूर दरम्यान बुलेट ट्रेन सुरू करण्याचा शासनाचा मानस असल्याने त्या दृष्टीने शासनाने पावले उचलली आहेत. आधीच शासनाने समृद्धी महामार्गाला मोठ्या प्रमाणात भूसंपादन केले आहे. समृद्धीचे काम पूर्ण होत नाही तोच आता प्रस्तावित बुलेट मार्गाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रस्तावित नागपूर-मुंबई दरम्यानचा मार्ग समृद्धी महामार्गाला लागून जाणार असल्याची वार्ता आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वी प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गाबाबत सर्वेक्षणालाही सुरुवात झाली असून इगतपुरी तालुक्यातील औचितवाडी परिसरात बुलेट ट्रेन मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण समृद्धी महामार्गाला लागूनच झाल्याने स्थानिक शेतकरी पुन्हा चिंतेत पडले आहेत.
बुलेट ट्रेन मार्गाच्या सर्वेक्षणाबाबत स्थानिक शेतकरीबांधवांना ही माहिती समजताच त्यांनी सर्वेक्षणस्थळी धाव घेऊन होत असलेले सर्वेक्षणाचे काम बंद पाडले. समृद्धीबाधित शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न अद्यापही रखडलेले आहेत. त्यामुळे शेतकरी नाराज असतानाच आता समृद्धीलगतच्या शेतकऱ्यांवरही आता भूमिहीन होण्याचे संकट निर्माण झाल्याची भावना बळावत चालली आहे.
इन्फो
येत्या दोन दिवसांत समृद्धीबाधित शेतकऱ्यांसंमवेत चर्चा करण्यासाठी व शेतकऱ्यांचे रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी तसेच समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाचे राज्यमंत्री इगतपुरी तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी अधिकारी व शेतकऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे. या बैठकीतच प्रस्तावित बुलेट मार्गाच्या प्रश्नावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीत बुलेट रेल्वेमार्गाबाबत काय माहिती मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फोटो- ०३ बुलेट ट्रेन
शेतकऱ्यांनी बुलेट ट्रेनच्या सर्वेक्षणाला विरोध करत बंद पाडलेले काम.
===Photopath===
030221\03nsk_20_03022021_13.jpg
===Caption===
फोटो- ०३ बुलेट ट्रेन शेतकऱ्यांनी बुलेट ट्रेनच्या सर्वेक्षणाला विरोध करत बंद पाडलेले काम.