अंबड ट्रकटर्मिनलच्या जागेत बुलेट ट्रेनचे सुटे भाग बनवणारा उद्योग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:16 IST2021-07-27T04:16:09+5:302021-07-27T04:16:09+5:30
सातपूर : अंबड औद्योगिक वसाहतीतील बहुचर्चित ट्रकटर्मिनलसाठी आरक्षित भूखंडाचे प्रकरण गाजत असताना आता या तीन एकरच्या भूखंडावर डायनामिक प्रेस्टेस ...

अंबड ट्रकटर्मिनलच्या जागेत बुलेट ट्रेनचे सुटे भाग बनवणारा उद्योग!
सातपूर : अंबड औद्योगिक वसाहतीतील बहुचर्चित ट्रकटर्मिनलसाठी आरक्षित भूखंडाचे प्रकरण गाजत असताना आता या तीन एकरच्या भूखंडावर डायनामिक प्रेस्टेस उद्योग समूह ५० कोटी रुपयांची गूंतवणूक करणार आहे. नाशिकला गुंतवणुकीचा ओघ वाढत असल्याने उद्योजकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
अंबड औद्योगिक वसाहतीत ट्रकटर्मिनलसाठी तीन एकरचा भूखंड आरक्षित ठेवण्यात आला होता. या आरक्षित असलेल्या भूखंडाचे आरक्षण बदलून ती जागा प्रेस्टेस उद्योग समूहाला देण्यात आली आहे. त्यावरून सध्या औद्योगिक क्षेत्रात बरेच वाद-विवादही सुरू आहेत. तथापि, मिळालेल्या माहितीनुसार
या गुंतवणुकीतून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जवळपास हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे. डायनामिक प्रेस्टेस उद्योगाला अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचे काम मिळालेले आहे. येत्या दोन-तीन महिन्यात काम सुरू करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात सिन्नर आणि सातपूर औद्योगिक वसाहतीत डायनामिक प्रेस्टेस उद्योगाचे पाच युनिट आहेत. या माध्यमातून सुमारे १,१०० लोकांना रोजगार मिळाला आहे. पूल बांधणीला लागणाऱ्या प्रेस्टेसिंग व गर्डर व पिलरमध्ये टकल्या जाणाऱ्या बेअरिंगच्या उभारणीचे काम प्रामुख्याने केले जाते. या उत्पादनांना भारतासह बांगला देश व दुबई येथे मोठी मागणी आहे. शिवाय कंपनीच्या माध्यमातून देशभरातील मेट्रो पुलासाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा केला जातो. यासोबतच शिवडी ते न्हावा-शेवा, मरिन ड्राइव्हसह विविध कोस्टल ब्रिजचे काम कंपनीच्या माध्यमातून केले जात असल्याचेही कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.
इन्फो..
आरक्षण बदलून कंपनीला भूखंड प्रदान करण्यावरून वाद सुरू असले तरी एमआयडीसीच्या मुख्यालयातून या उद्योगासाठी भूूूखंड देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकला गुंतवणूक येत नसल्याने उद्योजकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. आता हळूहळू गुंतवणूक वाढू लागल्याने उद्योग वर्तुळात समाधानाचे वातावरण पसरले आहे. अर्थात, आरक्षण बदलल्याने वाद सुरू आहेच.