शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

भुजबळांच्या पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 12:49 AM

नाशिक : येवला मतदारसंघातून शिवसेनेने आपल्या उमेदवाराची घोषणा करत त्यांच्याकडे ए व बी फॉर्मही सुपुर्द केल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पक्षांतराच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भुजबळ यांच्या पक्षांतरासाठी होणाऱ्या ‘तारीख पे तारीख’ची चर्चाही आता संपुष्टात आली आहे. भुजबळ हे येवला मतदारसंघातून राष्टÑवादीचे उमेदवार असतील व त्यांची लढाई २०१४ मधीलच प्रतिस्पर्ध्याशी होणार आहे.

ठळक मुद्दे निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात भुजबळ सेनेत प्रवेश करतील अशा तारखा ठरविणारे मुहूर्त जाहीरही होत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : येवला मतदारसंघातून शिवसेनेने आपल्या उमेदवाराची घोषणा करत त्यांच्याकडे ए व बी फॉर्मही सुपुर्द केल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पक्षांतराच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भुजबळ यांच्या पक्षांतरासाठी होणाऱ्या ‘तारीख पे तारीख’ची चर्चाही आता संपुष्टात आली आहे. भुजबळ हे येवला मतदारसंघातून राष्टÑवादीचे उमेदवार असतील व त्यांची लढाई २०१४ मधीलच प्रतिस्पर्ध्याशी होणार आहे.येवला मतदारसंघातून गेल्या तीन निवडणुका लढविणारे छगन भुजबळ यांच्याविषयी यंदा निवडणुकीपूर्वी मतदारांमध्ये नाराजी असल्याच्या वार्ता पसरल्या होत्या. त्यातून भुजबळ यांना सेना जोरदार टक्कर देणार असल्याचेही बोलले जात होते. मध्यंतरी भुजबळ यांचे मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाल्याचा फायदा विरोधकांनी उचलून त्यांच्याविषयी वातावरण तापविण्यास सुरुवात झाली व त्यातूनच भुजबळ सेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा पसरल्याहोत्या.विशेष म्हणजे अशा प्रकारच्या संभ्रम निर्माण करणाºया चर्चा होत असताना भुजबळ यांच्याकडून तत्काळ त्याचे खंडणही केले जात नव्हते. त्यामुळे या चर्चांना पुष्टी मिळू लागली होती. दरम्यान, भुजबळ यांनी आपण राष्टÑवादीतच राहणार असा खुलासा केला. त्याचबरोबर त्यांच्या सेना प्रवेशाच्या वृत्तामुळे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मातोश्री गाठून तीव्र विरोध दर्शविला होता. त्यातून उद्धव ठाकरे यांनीदेखील भुजबळ यांना प्रवेश देणार नाही, असे जाहीर केले होते.विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना शिवसेनेने येवला मतदारसंघातून आपल्या उमेदवाराला ए व बी फॉर्म सुपूर्द केलाआहे. त्यामुळे भुजबळ यांचे नाव आपोआपच मागे पडून त्यांच्या पक्षांतराची चर्चा संपुष्टात आली आहे. दुसरीकडे भुजबळ यांनीदेखील राष्ट्रवादीकडूनच येवल्यातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. जसजशी निवडणूक जवळ येत गेली, भुजबळ यांच्या पक्षांतराच्या चर्चा अधिक जोरात होऊ लागल्या होत्या. खुद्द भुजबळदेखील या काळात पक्षापासून दूर गेल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात भुजबळ सेनेत प्रवेश करतील अशा तारखा ठरविणारे मुहूर्त जाहीरही होत होते.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळElectionनिवडणूक