दरेगावच्या आयुर्वेदिक दवाखान्याला अखेर मिळाली इमारत

By Admin | Updated: July 10, 2014 00:57 IST2014-07-09T21:34:53+5:302014-07-10T00:57:50+5:30

दरेगावच्या आयुर्वेदिक दवाखान्याला अखेर मिळाली इमारत

The building was finally found in the Ayurvedic dispensary of Daregaon | दरेगावच्या आयुर्वेदिक दवाखान्याला अखेर मिळाली इमारत

दरेगावच्या आयुर्वेदिक दवाखान्याला अखेर मिळाली इमारत

 

दरेगाव : चांदवड तालुक्यातील दरेगाव येथे एकमेव आयुर्वेदिक दवाखाना आहे. या दवाखान्याला मात्र स्वत:ची इमारत नाही येथे इमारत मिळावी यासाठी गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून वारंवार मागणी कार्यक्षेत्रातील गावांमधून करण्यात येत होती. त्यावर निर्णय होत नव्हता. मात्र ही दीर्घ प्रतीक्षा संपली असून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येथे इमारत साकारत असून, त्यामुळे रुग्णांची गैरसोय टळणार आहे.
नाशिक जिल्ह्यात मोजकेच आयुर्वेदिक दवाखाने आहेत. त्यात दरेगावचा समावेश होतो. मार्च २०१३ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळालेल्या आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये खंबाळे (सिन्नर), विंचूर (निफाड), अनकाई व कातरणी (येवला), दरेगाव (चांदवड), कावनाई (इगतपुरी), शेरुळ (मालेगाव), कळमदरी (नांदगाव) या सात तालुक्यांतील आठ आयुर्वेदिक दवाखान्याच्या कामांचा समावेश
आहे.
दरेगाव आयुर्वेदिक दवाखान्याला स्थापनेपासून स्वत:ची जागा व इमारत नव्हती. दरेगाव गावात ग्रामस्थांनी कार्यालय व दुसऱ्या एका खोलीत आयुर्वेदिक दवाखाना गावातील ग्रामपंचायतजवळील इमारतीत होता. ग्रामस्थांनी कोणतेही भाडे न आकारता इमारत मोफत उपलब्ध करून
दिली. कालांतराने पावसाने ती जुनी झालेली इमारत पडल्याने दवाखान्याच्या जागेचा प्रश्न उपस्थित झाला. गावात शाळेजवळ उसवाड आरोग्य केंद्रांंतर्गत आरोग्य उपकेंद्राची नवीन इमारत झाल्याने सदर दवाखाना उपकेंद्रात स्थलांतरित करण्यात आला.
सदर उपकेंद्रात मदतनीस, आरोग्यसेवक यांना विविध आरोग्य मोहिमा व नियमित देण्यात येणारे डोस, जननीसुरक्षा योजना यासारख्या उपक्रमासाठी उपकेंद्र इमारत महत्त्वाची असते. आयुर्वेदिक दवाखाना व उपकेंद्र एकाच इमारतीत आल्याने गैरसोय होती.
सदर दवाखान्यासाठी २०१२ मध्ये दरेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी मासिक सभेतील ठरावाद्वारे जागा उपलब्ध करून दिली. गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून मागणी असणारी इमारत आयुर्वेदिक दवाखान्याला मिळत असल्याने परिसरातील गावांचा प्रश्न सुटणार आहे. (वार्ताहर)

Web Title: The building was finally found in the Ayurvedic dispensary of Daregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.