ठिकठिकाणी बुद्धवंदना : भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन नाशिक : भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय संस्था, संघटनांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ठिकठिकाणी सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली, तसेच अन्नदान व मिठाई वाटपाचा कार्यक्रमही पार पडला. भाजपा अनूसूचित जाती मोर्चाभारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने बुद्धमूर्तीस पुष्पगुच्छ वाहण्यात आला व मिठाई वाटप करण्यात आली. भन्तेजी सुखत यांनी बुद्धवंदना म्हटली. याप्रसंगी शहराध्यक्ष दीपक शेवाळे, सुरेश पाटील, जगन पाटील, कुणाल गायकवाड, सुरेश मानकर, अभय ताटे, सतीश गायकवाड, उत्तम शिंदे, अमित ताटे, राकेश सुपारे, पंकज भुजंग, शरद इंगळे आदि उपस्थित होते. गौतमी महिला मंडळसिडकोतील गौतमी महिला बहुद्देशीय महिला मंडळाच्या वतीने अन्नदानाचा कार्यक्र म पार पडला. याप्रसंगी भिक्खू संघाला अष्टपुरस्कार प्रदान करण्यात आला. गौतमी बुद्धविहाराचे काम सुरू असून, या ठिकाणी बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. याप्रसंगी शैला उघाडे, राजश्री शेजवळ, वैशाली जाधव, विमल उन्हवणे, वैशाली जगताप, ज्योती खडसे, तृप्ती वाघ, श्वेता जगताप, संदेश जाधव, रोहित उघाडे, योगेंद्र जगताप आदि उपस्थित होते. आपलं वाचनालयपेठरोड येथील अश्वमेघनगरातील आपलं सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाच्या वतीने गौतम बुद्ध यांना पुष्प सुमनांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष हरिभाऊ काळे, सचिव अरुण भानू, ग्रंथपाल यतिन भानू, दिलीप सुतार, देवानंद गवई, अजय लोखंडे, अर्जुन काळे, उत्तम ईटनारे, वामन क्षीरसागर, नंदू अहिरे, रतन जाधव आदि वाचक, सभासद उपस्थित होते. जनसेवा वाचनालयगोवर्धन गावातील जनसेवा सार्वजनिक वाचनालय व लोकसमय फाउण्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाचनालयात शांताराम पठाडे, अमृत गांगुर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतिदूत भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य किशोर जाधव, दिलीप थेटे, तसेच जितेंद्र पगारे, अनिता गडादरा, राजू शेलार, संतोष गांगुर्डे, रोहन बेंडकोळी, मुकेश वाघ, डी. जी. खोटरे, आकाश घेगडमल, अमित शर्मा आदि उपस्थित होते. प्रमोद जाधव यांनी सूत्रसंचालन केले. राजू शेलार यांनी आभार मानले. -(फोटो आहेत)
बुद्धम् शरणम् गच्छामि...
By admin | Updated: May 15, 2014 00:13 IST