बुद्ध विहारमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:43 IST2021-02-05T05:43:40+5:302021-02-05T05:43:40+5:30
नाशिकरोड : देवी चौक येथील महाकर्मभूमी बुद्ध विहार येथे बुद्ध विहार ट्रस्ट व भारतीय बौद्ध महासभेतर्फे प्रजासत्ताक दिन साजरा ...

बुद्ध विहारमध्ये
नाशिकरोड :
देवी चौक येथील महाकर्मभूमी बुद्ध विहार येथे बुद्ध विहार ट्रस्ट व भारतीय बौद्ध महासभेतर्फे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला हार अर्पण करून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. ज्येष्ठ मार्गदर्शक आर. बी. होर्शिल, एस. एल. जाधव, शहर अध्यक्ष प्रवीण बागुल यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी ट्रस्टचे माणिक साळवे, रविकांत भालेराव, महासचिव चावदास भालेराव, बाळासाहेब पगारे, सुशीला जाधव, नूतन साळवे, लीना खरे, आशिष साळवे, संतोष धोत्रे, संतोष सोनवणे, अशोक साळवे, अशोक कांबळे, कुणाल कांबळे, प्रभाकर कांबळे, एच. के. भालेराव, गणेश कांबळे, नारायण भंडारे, प्रल्हाद उघडे, मोहन बागुल, नंदू जाधव, संजय करेडे, साहेबराव गायकवाड आदी उपस्थित होते.