शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकसह महाराष्टÑात मार्चपर्यंत बीएसएनएलची फोर-जी सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 00:43 IST

नाशिक : खासगी कंपन्यांच्या तुलनेत सरकारचे पाठबळ असताना मागे पडलेल्या बीएसएनएलबाबत केंद्र सरकारने आता सकारात्मक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे निगमने तीन महिन्यांपासून नाशिक जिल्ह्णात थ्रीजी सेवा देण्यास प्रारंभ केला आहे. त्यापलीकडे जाऊन येत्या मार्चपर्यंत महाराष्टÑात फोरजी सेवा सुरू होणार आहे. त्याचा मोठा लाभ नागरिकांना होईल, असा विश्वास भारत दूरसंचार निगम लिमिटेडचे वरिष्ठ महाप्रबंधक नितीन महाजन यांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देनितीन महाजन : शहरासह तालुक्यांच्या ठिकाणी थ्री-जीला प्रारंभ

नाशिक : खासगी कंपन्यांच्या तुलनेत सरकारचे पाठबळ असताना मागे पडलेल्या बीएसएनएलबाबत केंद्र सरकारने आता सकारात्मक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे निगमने तीन महिन्यांपासून नाशिक जिल्ह्णात थ्रीजी सेवा देण्यास प्रारंभ केला आहे. त्यापलीकडे जाऊन येत्या मार्चपर्यंत महाराष्टÑात फोरजी सेवा सुरू होणार आहे. त्याचा मोठा लाभ नागरिकांना होईल, असा विश्वास भारत दूरसंचार निगम लिमिटेडचे वरिष्ठ महाप्रबंधक नितीन महाजन यांनी व्यक्त केला आहे.येत्या ८० दिवसांत केंद्र सरकारच्या माध्यमातून निगमला फोरजी सेवेसाठी स्पेक्ट्रम उपलब्ध होणार असून त्यानंतर ही सेवा महाराष्टÑात सुरू होईल. राज्यासाठी सहा हजार टॉवर मंजूर झाले असून, नाशिक जिल्ह्णासाठी ६३० फोरजी टॉवरचा त्यात समावेशआहे. सध्या असलेल्या टॉवरमध्ये एक छोटे कार्ड बदलल्यानंतर फोरजी सेवा सुरू होईल. त्यामुळे निगमच्या ग्राहकांना २० ते ४० एमबीपीएस स्पीड मिळेल, असेही महान यांनी सांगितले.निगमने ६३० साईट्सवर थ्रीजी टॉवर उभारले असून त्यामुळे नाशिक शहराबरोबरच मनमाड, येवला, सटाणा, मालेगाव शहर, इगतपुरी यांसह सर्व तालुक्यांच्या ठिकाणी थ्रीजी सेवा देण्यास प्रारंभ झाला आहे. केवळ तालुका ठिकाणच नव्हे तर ननाशी, निगडोळ, अंदरसूल, पाटोदा, वडांगळी, ठाणगाव, ताहाराबाद, नामपूर, लखमापूर याठिकाणीही ही सेवा दिली जाणार असल्याची माहिती नितीन महाजन यांनी दिली.थ्रीजी सेवा सुरू झाल्यानंतर नाशिक शहर आणि ग्रामीण भागात आठ हजार सीम काडर््सचे वाटप सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्णात विविध खासगी कंपन्यांच्या थ्रीजी सेवा असल्या तरी निगमच्या सेवेला स्पर्धात्मकदृष्ट्या अधिक स्पीड असल्याचे ते म्हणाले.डाउनलोडिंगमध्ये नाशिक दुसरेमहाराष्टÑात निगमच्या मोबाइल डेटा डाउनलोडिंगमध्ये नाशिक दुसऱ्या क्रमांकावर आहे. नाशिकमध्ये पंधरा हजार जीबी डाउन लोड होतात. तर पुणे प्रथम क्रमांकावर असून, पुण्यात सतरा ते अठरा हजार जीबी डाटा रोज डाऊनलोड होत असतो.३८२ ग्रामपंचायती झाल्या डिजिटलनाशिक जिल्ह्णातील ६१० ग्रामपंचायतींना निगमने फायबर आॅप्टिकलने जोडले असून, ३८२ ग्रामपंचायतींनी निगमकडे पैसे भरून नियमित इंटरनेट सेवा सुरू केली आहे, त्यामुळे या ग्रामपंचायती क्षेत्रातील नागरिकांना अनेक सेवा आणि दाखले त्यावरून प्राप्त होत आहेत.