बीएसएनएलची ब्रॉड बॅण्ड सुविधा कोलमडली

By Admin | Updated: August 10, 2014 02:03 IST2014-08-10T01:47:24+5:302014-08-10T02:03:43+5:30

बीएसएनएलची ब्रॉड बॅण्ड सुविधा कोलमडली

BSNL's broadband facility collapses | बीएसएनएलची ब्रॉड बॅण्ड सुविधा कोलमडली

बीएसएनएलची ब्रॉड बॅण्ड सुविधा कोलमडली

 

नाशिक : इंटरनेट सुविधा पुरविण्यासाठी खासगी कंपन्यांमध्ये पराकोटीची स्पर्धा सुरू असताना, देशभरात सर्वाधिक जाळे असणाऱ्या भारत दूर संचार निगमची (बीएसएनएल) अंबड औद्योगिक वसाहतीतील ब्रॉड बॅण्ड सुविधा आज दिवसभर कोलमडली होती. त्यामुळे बीएसएनएलच्या ग्राहकांना नको त्या कटकटीला सामोरे जावे लागलेच परंतु ज्यांचा व्यवसायच या सुविधेवर अवलंबून असतो, त्यांना मात्र कोट्यवधींचा फटका बसला आहे.
टु-जी नंतर थ्री-जी सुविधा आणि आता फोर-जी सुविधा करण्याची खासगी कंपन्यांमध्ये चढाओढ लागलेली असताना सर्वात मोठी ग्राहक संख्या असलेल्या बीएसएनएलला मात्र आहे ती सुविधा देण्यातही तत्परता दाखविता येत नसल्याने त्यांचा हक्काचा ग्राहक खासगी कंपनीकडे वळू लागला आहे. भ्रमणध्वनीच्या रेंजमध्ये अडचणी असल्याच्या ग्राहकांच्या सातत्याच्या तक्रारी असताना आता इंटरनेट सुविधाही वारंवार कोलमडत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहे.
आज (शनिवारी) सकाळी ७ वाजेपासून अंबड औद्यागिक वसाहतीतील बीएसएनएलची ब्रॉड बॅण्ड सुविधा कोलमडली. सदरची सुविधा सुरळीत करण्यासाठी रात्रीच्या आठ वाजले. शनिवार असल्याने औद्योगिक वसाहतीतील बऱ्याचशा कंपन्या बंद असल्या तरी अनेक कंपन्यांचे कार्यालयीन व डाटासंदर्भातील कामे सुरूच असतात. मात्र, बीएसएनएलची ब्रॉड बॅण्ड सुविधाच सकाळपासून तांत्रिक कारणामुळे बंद पडली. यासंदर्भात अनेक ग्राहकांनी बीएसएनएलच्या संबंधित विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता समाधानकारण उत्तरे मिळत नव्हती.
तसेच सदरची सेवा सुरळीत होण्यासाठी किती कालावधी लागेल याबाबतही माहिती दिली जात नव्हती. त्यामुळे परिसरातील बॅँकांची कार्यालयांसह अनेक कंपन्यांची आॅनलाईन सुरू असलेली कामे खोळंबली. रात्री आठच्या सुमारास सदरची सेवा सुरू झाली असली तरी मात्र अखेरपर्यंत सदरची सेवा खंडित होण्यामागचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. (प्रतिनिधी)
उपसरपंचपदी सोनवणे
मालेगाव : तालुक्यातील टोकडे गावाच्या उपसरपंचपदी शंकर सोनवणे यांची आवर्तन पद्धतीने बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच कमळाबाई रंधवा होत्या. मावळते उपसरपंच धोंडू कव्हाड यांनी राजीनामा दिल्यानंतर सदर निवडणूक घेण्यात आली. ग्रामसेवक भाऊसाहेब मगरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. (प्रतिनिधी)

Web Title: BSNL's broadband facility collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.