काजीसांगवी परिसरात बीएसएनएलची सेवा ठप्प
By Admin | Updated: July 12, 2014 00:26 IST2014-07-11T22:45:12+5:302014-07-12T00:26:35+5:30
काजीसांगवी परिसरात बीएसएनएलची सेवा ठप्प

काजीसांगवी परिसरात बीएसएनएलची सेवा ठप्प
रेडगाव खुर्द : काजीसांगवी येथील महावितरणच्या नियोजित भारनियमनासह ऐनवेळीच्या लपंडावात पर्यायी सक्षम व्यवस्थेअभावी परिसरातील इंटरनेट व भ्रमणध्वनी सेवाही वारंवार ठप्प होत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
तालुक्यातील काजीसांगवी येथे भारत संचार निगमचे कार्यालय
आहे. परिसरातील पाच-सहा
गावांसह काळखोडे, पिंपळद एक्स्चेंज अंतर्गत येणाऱ्या गावांची सेवाही काजीसांगवी येथील यंत्रणेवर अवलंबून आहे. परिसरातील हजारो शेतकऱ्यांनी सीयूजी योजनेंतर्गत मोबाइल सीमकार्ड घेतले आहे.
तसेच अनेक ग्राहक इंटरनेटचा
उपयोग करतात. येथील नियोजित भारनियमन सुरू होताच परिसरातील मोबाइल सेवेत सुरुवातीला नॉट रिचेबल, व्यस्त आहे, बंद आहे,
पुन्हा प्रयत्न करा अशी वेगवेगळी धून ऐकायला मिळते. कधी आपला आवाज समोरच्याला ऐकायला
जात नाही. त्यामुळे परिसरातील ग्राहकांना बीएसएनएलची सेवा
असून अडचण नसून खोळंबा ठरत आहे.
त्याचप्रमाणे सोशल साइटचा वाढता वापर यामुळे अनेक जण खासगी सेवेला पसंती देऊ लागले आहे. याबाबत काजीसांगवी येथील पर्यायी व्यवस्था म्हणून असलेले विद्युत जनित्र जुने झाल्याने ते ठीक चालत नाही तर बॅटरी निकामी झाल्याने अर्ध्या तासापेक्षा अधिक चालत नाही. त्यामुळे विजेच्या भारनियमनाप्रमाणे परिसरातील मोबाइल सेवेचेही भारनियमन होत आहे. भारनियमनाव्यतिरिक्त होणाऱ्या विजेच्या लपंडावात मोबाइल सेवेचा बोजवारा उडत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)