शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये भर रस्त्यावर युवकाचा निर्घृण खुन; जुन्या वादातून घेरून केला हल्ला

By अझहर शेख | Updated: March 9, 2025 09:55 IST

कॉलेजरोडवरील संत कबीर नगरमधील मुख्य रस्त्यावर घडला प्रकार

नाशिक : सातपुर कामगार नगरमधील एका युवकाचा टोळक्याने धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खुन केल्याची घटना शनिवारी (दि. ८) रात्री अकरा वाजेच्या सुमारास कॉलेजरोडवरील संत कबीर नगरमधील मुख्य रस्त्यावर घडली. अरुण राम बंडी (२९, रा.कामगार नगर, सातपूर ) असे मृत झालेल्या युवकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 सातपूर परिसरातील कामगार नगर भागात राहणारा अरुण हा संत कबीर नगर परिसरात रात्री आला असता त्याचे जुने वाद असलेल्या सातपुरच्या एका टोळक्याने त्याला या ठिकाणी घेरले. धारदार शस्राने त्याच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अरुण हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळाहून पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. मुख्य रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला होता. तसेच हल्लेखोरांच्या दोन दुचाकी रस्त्यावर तोडफोड करून पाडण्यात आल्या होत्या. घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने दंगल नियंत्रण पथकाचे काही जवानांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. दरम्यान गंगापूर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत परिसरात शोध घेत तिघा हल्लेखोर संशयिताना ताब्यात घेतले. यामधील दोघे जण फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव, गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपुत, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर या अधिकाऱ्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. रात्री उशिरापर्यंत परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान मृतदेह घटनास्थळावरून शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर परिसरात गर्दी जमली होती यामुळे सरकारवाडा पोलीस ठाण्याचा बंदोबस्त शासकीय रुग्णालयात तैनात करण्यात आला होता. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते 

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी