तोतया पोलिसांकडून वृद्ध दाम्पत्याची लूट

By Admin | Updated: October 31, 2015 00:04 IST2015-10-31T00:03:30+5:302015-10-31T00:04:09+5:30

तोतया पोलिसांकडून वृद्ध दाम्पत्याची लूट

Brutal gang robbery by police | तोतया पोलिसांकडून वृद्ध दाम्पत्याची लूट

तोतया पोलिसांकडून वृद्ध दाम्पत्याची लूट

नाशिक : पोलीस असल्याची बतावणी करून तोतया पोलिसांनी वृद्ध दाम्पत्यास लुटल्याची घटना गुरुवारी (दि़२९) सकाळच्या सुमारास देवळाली कॅम्प परिसरात घडली आहे़
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवराम रामचंद्र सुजगुरे (७८, रा़ शिवशांती दत्त पेट्रोलपंपासमोर, लॅमरोड, विहितगाव) हे पत्नी शांताबाई यांच्यासमवेत गुरुवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास फिरून घरी जात होते़ त्यावेळी आलेल्या दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करून दागिने पिशवीत काढून ठेवण्याचा सल्ला केला़ त्यानुसार सुजगुरे यांनी साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण व अंगठ्या काढल्या असता त्या ठेवून देण्याचा बहाणा करून दोघा तोतया पोलिसांनी हे दागिने लंपास केले़ या प्रकरणी शिवराम सुजगुरे यांच्या फिर्यादीनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Brutal gang robbery by police