गुुंगीचे औषध पाजून विवाहितेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 00:10 IST2019-12-24T00:09:04+5:302019-12-24T00:10:28+5:30
एका महिलेस धमकी देत संशयित आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित बाळू गिरिधर जाधव याच्याविरुद्ध अत्याचारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

गुुंगीचे औषध पाजून विवाहितेवर अत्याचार
नाशिक : नांदूर नाका भागातील एका महिलेस धमकी देत संशयित आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित बाळू गिरिधर जाधव याच्याविरुद्ध अत्याचारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पीडितेसोबत असलेल्या ओळखीमुळे संशयित बाळू याने पीडितेला पाथर्डी फाटा येथील एका कॅफेत पाण्यामध्ये गुंगीचे औषध पाजून येथील एका हॉटेलमध्ये अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयिताने तिचे मोबाइलवर चित्रीकरण व छायाचित्रे काढून ते सासरी व माहेरी व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक निरीक्षक ए. के. जगताप हे करीत आहेत.