लोकमत न्यूज नेटवर्कचांदवड : तालुक्यातील न्हनावे येथे २५ वर्षीय विवाहिता व तिचा चार वर्षाचा मुलगा असे दोघेही घरात भाजून मरण पावल्याची घटना घडली. पोलीसपाटील शरद विठ्ठल ठाकरे यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीनुसार, न्हनावे येथील अर्चना ज्ञानेश्वर अहेर (२५), तिचा मुलगा प्रणय ज्ञानेश्वर अहेर (४) दोघे शुक्रवारी (दि. ५) सकाळी ११.४५ वाजता अहेरवस्ती परिसरात घरात भाजून मरण पावले. घटनेची माहिती मिळताच चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, जमादार पी. एन. खैरनार, नरेश सैंदाणे, मंगेश डोंगरे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचत शव चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणले. मयत अर्चना हिचे सासू, सासरे हे नातलगांकडे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. मृताचा पती हा चालक असून, तोही बाहेर गेल्याचे सांगण्यात येते. मयत विवाहितेचे माहेर गणूर येथील असून, तिच्या मृत्यूूबाबत माहेरच्यांनी संशय व्यक्त केला आहे. चांदवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. चांदवड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास जमादार पी.एन. खैरनार करीत आहे.
न्हनावेत विवाहितेचा चार वर्षाच्या मुलासह भाजून मृत्यू
By admin | Updated: May 6, 2017 02:14 IST