दिंडोरी - दिंडोरी तालुक्यातील मडकीजांब शिवारातील जुना जांबुटके रस्ता वाघोबा मळा येथे चारित्राच्या संशयावरून मोठ्या भावाने लहान भावाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार कैलास बाळासाहेब वडजे (३०) व संशयित आरोपी सुनील बाळासाहेब वडजे यांच्यात जुना जांबुटके रस्त्यालगतच्या वाघोबा मळा येथील घरात वाद झाला. सुनीलने कैलासवर संशय घेत वाद निर्माण केला. रागाच्या भरात लोखंडी गजाने कैलास यास जबर मार लागला. त्यानंतर कैलासला दिंडोरी ग्रामीण उपचारार्थ रु ग्णालयात दाखल करण्यात आले होते .परंतू कैलास याची प्रकृतीत जास्त बिघाड झाल्यामुळे त्याला नाशिक येथील जिल्हा रु ग्णालयात नेल्यानंतर उपचार दरम्यान मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगीतले . सदर मारहान करणारा संशयित आरोपी सुनिल बाळासाहेब वडजे (३२, रा मडकीजांब) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास नाशिक पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे,पोलीस उपनिरीक्षक कल्पेश चव्हाण करत आहे .
चारित्र्याच्या संशयावरून भावाकडून भावाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 13:03 IST