शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

बहीण-भावाचा धुमाकूळ: पुण्यासह अनेक जिल्ह्यांत चोरी; आता असे अडकले जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 19:53 IST

पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपींनी पुणे येथील सहकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत व सोलापूरच्या बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराफी पेढी दुकानात चोरी केल्याची कबुली दिली.

Nashk Crime: नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर येथील पु. ना. गाडगीळ अॅण्ड सन्स या सराफी पेढीमध्ये संशयास्पद वावरणाऱ्या बहीण-भावाला उपनगर पोलिसांनी पकडल्यानंतर त्यांचेकडून अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. सोलापूर व पुणे शहरातील सराफी पेढीमधून हात चलाखीने सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांच्याकडून सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केल्याचे आल्याचे पोलिस आयुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले. 

शिखरेवाडी येथील स्टार झोन मॉलमधील पु. ना. गाडगीळ अॅण्ड सन्स या सराफी पेढीमध्ये गेल्या महिन्यात १७ डिसेंबर रोजी दोन सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याचा प्रकार काही दिवसानंतर उघडकीस आला होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासल्यानंतर इसम व त्याच्यासोबत असलेल्या महिलेने सुमारे अडीच लाख रुपये किमतीच्या तीन तोळ्याच्या सोन्याच्या दोन बांगड्या चोरल्याचे दिसून आले. संशयित चंद्रकांत विनोदभाई परमार (५५), पूनम कमलेश शर्मा (५७) रा. स्वामीनारायण, स्वामी पार्क, अहमदाबाद गुजरात या बहीणभावास अटक करण्यात आली होती. उपनगर पोलिस ठाण्यात आणले. उपनगर पोलिसांनी त्यांची कसन चौकशी केली असता त्यांनी नाशिकरोड येथील गाडगीळ अॅण्ड सन्स या दुकानात १५ दिवसांपूर्वी दोन सोन्याच्या बांगड्या चोरल्याची कबुली दिली. 

दोघा संशयित बहीणभावांना नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता सहा दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आल्याचे मोनिका राऊत यांनी सांगितले. 

दरम्यान, पोलिस कोठडीमध्ये असलेल्या दोघा संशयित बहीणभावांची उपनगर पोलिसांनी कसून चौकशी केली असता  त्यांनी पुणे येथील सहकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत व सोलापूरच्या बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराफी पेढी दुकानात अशाच पद्धतीने हातचलाखीने सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली देत ते दागिने गुजरात राज्यातील बडोदरा येथील सोन्याचे काम करणाऱ्या कारागिरास विकल्याची माहिती दिली.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी