शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
3
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
4
IPL 2024 DC vs MI: मुंबईने टॉस जिंकला! हार्दिकने रिषभच्या मनासारखा निर्णय घेतला, पृथ्वीला विश्रांती
5
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
6
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
7
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
8
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
9
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
10
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
11
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
12
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
13
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
14
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
15
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
16
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
17
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
18
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
19
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
20
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला

किरकोळ वादातून नाशिकरोडला भाजीविक्रेत्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 1:38 AM

उड्डाणपुलाखालील भाजीबाजारात दुचाकी बाजूला केल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून नरसिंग शिंदे या भाजीविक्रेत्याची हत्या झाल्याची घटना अरिंगळेमळा येथे घडली. पाच जणांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्यात मयत शिंदे यांचा मुलगादेखील गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या तिघा संशयितांना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

नाशिकरोड : उड्डाणपुलाखालील भाजीबाजारात दुचाकी बाजूला केल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून नरसिंग शिंदे या भाजीविक्रेत्याची हत्या झाल्याची घटना अरिंगळेमळा येथे घडली. पाच जणांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्यात मयत शिंदे यांचा मुलगादेखील गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या तिघा संशयितांना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकलहरारोड अरिंगळे मळ्यातील श्रीकृष्णनगर येथे राहणारे नरसिंग गोपीनाथ शिंदे (४२) नाशिकरोड उड्डाणपुलाखालील भाजीबाजारात उसळ विक्रीचा व्यवसाय करत होते. रविवारी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास नरसिंग यांचा मुलगा मारुती हा वडिलांना उसळ विक्री करण्यास मदत करण्यासाठी उड्डाण पुलाखाली कार घेऊन भाजीबाजारात गेला होता. मात्र त्यांच्या दुकानाजवळील मोकळ्या जागेत दुचाकी उभी असल्याने मारुती याने सदर दुचाकी बाजूला केली. यावरून दुचाकीमालक दीपक शंकर पाडळे (रा. पाण्याच्या टाकीजवळ, सामनगावरोड) याला राग आल्याने त्याने मारुती याच्याबरोबर वाद घातला. यातून नरसिंग व दीपक यांच्यात झटापटी झाली मात्र अन्य विक्रेत्यांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला होता.  त्यानंतर नरसिंग आणि त्यांचा मुलगा मारुती हे आपल्या घरी गेले. नरसिंग यांचा मुलगा संदीप यास घरी येण्यास उशीर झाल्याने त्याला बघण्यासाठी नरसिंग घराबाहेर पडले असता संशयित दीपक शंकर पाडळे, सुरेश उर्फ पिंट्या पांडुरंग सोनवणे, आकाश शंकर पाडळे, अमोल  शंकर पाडळे व एक अल्पवयीन  मुलगा या पाच जणांनी नरसिंग तसेच त्यांचा मुलगा संदीप यांना लाथाबुक्क्यांनी व दांड्याने  बेदम मारहाण केली. सुरेश ऊर्फ  पिंटू सोनवणे याने नरसिंग याच्यावर चाकूने वार केल्याने गंभीर जखमी नरसिंग यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. पाच दिवस पोलीस कोठडीया हल्ल्यात जखमी झालेला संदीप नरसिंग शिंदे व संशयित हल्लेखोर अमोल शंकर पाडळे हादेखील जखमी झाल्याने दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या तिघा संशयितांना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी