शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

समाजसेवाव्रती बहीण-भाऊ यांचा स्नेहबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:27 AM

बहीण-भावाचे नाते नाजूक बंधनाचे मानले जाते. लहानपणापासून एकमेकांशी कधी भांडून तर कधी हातात हात घालून ती वाढत-घडत असतात. आई, वडील, गुरुजन यांचे त्यात मोलाचे योगदान असतेच पण ही भावंडेही एकमेकांना घडवत असतात.

नाशिक : बहीण-भावाचे नाते नाजूक बंधनाचे मानले जाते. लहानपणापासून एकमेकांशी कधी भांडून तर कधी हातात हात घालून ती वाढत-घडत असतात. आई, वडील, गुरुजन यांचे त्यात मोलाचे योगदान असतेच पण ही भावंडेही एकमेकांना घडवत असतात. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर अशा नाशिकभूमीतून घडलेल्या आणि आज निरनिराळ्या क्षेत्रात आपल्या यशाची पताका फडकवणाऱ्या शहरातील बहीण-भावांच्या भावस्पर्शी कार्याचा हा आढावा...जयंत जायभावे आणि मी वकिली क्षेत्रात येण्याचे कारण म्हणजे आमचे वडील दत्तात्रय जायभावे होय. ते आमचे प्रेरणास्थान होते. आमचे वडील काळा कोट घालून कोर्टात जायचे तेव्हा त्यांचा एक वेगळाच रुबाब असायचा. त्यांचे व्यक्तिमत्त्वही तितकेच प्रभावी होते. कोर्टात, घरी, नातेवाइकांमध्ये त्यांच्या शब्दाला मान असायचा. त्यांचा शब्द अखेरचा शब्द मानला जायचा. लोक त्यांचा खूप आदर करायचे. ते न्यायबुद्धीने काम करायचे. हे सारे पाहून आम्ही दोघा भावंडांनी वकिली क्षेत्रात जायचे लहानपणीच ठरवले होते. जयंत माझ्यापेक्षा दीड वर्षाने लहान आहे. आम्ही लॉ ला प्रवेश घेतला. आमच्या या निर्णयाचा आमच्या वडिलांना खूप आनंद झाला. यथावकाश आम्ही अभ्यासक्रम पूर्ण केला. व्यवसायास प्रारंभ केला. या व्यवसायात काम करताना कोणते आदर्श पाळले पाहिजे ते त्यांनी आम्हाला सांगितले. त्याच पायवाटेवर आजही आम्ही वाटचाल करतो आहोत.कौटुंबिक गप्पांबरोबरच व्यवसायातले अनुभव आम्ही एकमेकांना सांगतो अन् त्यावर चर्चा करतो. आज आम्ही दोघेही आमच्याकडे येणारी जास्तीत जास्त प्रकरणे समजुतीने मिटविण्याला प्राधान्य देतो. - अ‍ॅड. वसुधा कराडमी व माझी बहीण प्राजक्ता अत्रे दोघेही गायन क्षेत्रात आज जे काही नाव मिळवू शकलो ते आई, वडील आणि गुरूंमुळेच. माझ्या आई-वडिलांना गायनाची आवड होती. आम्हा भावंडांमध्ये गाणे फुलेल, वाढेल यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. आम्ही दोघे वैरागकर सरांचे शिष्य आहोत. सरांकडे मी जास्त प्रमाणात गाणे शिकायला जायचो. घरी आल्यावर शिकलेल्या गोष्टी बहिणीला सांगायचो. दसककर सर आणि प्राजक्ता यांच्यातला मी दुवाच बनलो होतो. तिला गाण्याची उपजत देणगी होती. एखादी गोष्ट ती फार पटकन आत्मसात करते. लहानपणापासून तिचा आवाज खणखणीत होता. एकदा ती ५वीत असताना वाघ संस्थेत गाण्याची स्पर्धा होती. माईक नेमका तिच्यापासून लांब अंतरावर होता. पण त्यावेळी ती खूप खणखणीत आवाजात गायली. सर्वांना चकित करून टाकले. गाणे शिकताना समजलेल्या नवनव्या गोष्टी आम्ही एकमेकांना सांगायचो. आमची लहानपणापासून खूप छान मैत्री होती. त्या मैत्रीतूनच गाणे फुलत गेले. - आनंद अत्रे, गायकमाझी बहीण शैला दसककर आणि मी आमचे आजोबा, वडील, काका यांच्यामुळे गायन क्षेत्रात आलो. नाव, पैसा, प्रतिष्ठा मिळवू शकलो. आज माझी बहीण शैलामाई मुंबईत गाण्याचे, भजनाचे क्लास घेते. माझे आजोबा राष्टÑीय कीर्तनकार होते. काका मोठे गायक होते. वडील तर आजही गायन शिकवतात. आम्ही लहानपणी गावातल्या घरी रहायचो तेव्हा हॉर्न किंवा इतर आवाज आले की वडील आम्हाला त्यातला स्वर ओळखायला लावायचे. त्यातून आमचे स्वरज्ञान पक्के होत गेले. आम्हा बहीण भावंडांमध्ये गायनाची, रागांची स्पर्धा लागायची. वडील त्यात पुढाकार घ्यायचे. यातून आमचा पाया पक्का होत गेला. ही शिदोरी आजही उपयुक्त ठरत आहे.  - सुभाष दसककर, ज्येष्ठ गायक

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधन