तडीपार चांगलेला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:34 IST2017-07-23T00:34:25+5:302017-07-23T00:34:38+5:30
नाशिक : पंचवटीतील चांगले टोळीचा म्होरक्या व तडीपार फरार गुन्हेगार गणेश बाळासाहेब चांगले (रा़ हनुमानवाडी) याला सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी (दि़२१) अटक केली़

तडीपार चांगलेला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पंचवटीतील चांगले टोळीचा म्होरक्या व तडीपार फरार गुन्हेगार गणेश बाळासाहेब चांगले (रा़ हनुमानवाडी) याला सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी (दि़२१) अटक केली़ गत वर्षभरापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता़
चांगलेवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, वर्षभरापासून पोलिसांना गणेश चांगले हा गुंगारा देत होता़ शहरातील विविध पोलीस ठाण्यांत दरोडा पूर्वतयारी, लूट, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न असे विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे चांगलेवर दाखल असून, त्याच्याकडून गावठी कट्टे व जीवंत काडतुसेही पोलिसांनी जप्त केली आहेत.विविध पोलीस ठाण्यांतील तेरा गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याला यापूर्वी पोलिसांनी अटकही केली होती़ २०१३ मध्ये चांगले यास दोन वर्षांसाठी तडीपारही करण्यात आले होते़ गुन्हे शोध पथकाला चांगले हा शहरात येणार असल्याची खबर लागली. पोलिसांनी चांगलेला सापळा रचून अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्यासह आदिंनी कामगिरी केली.