सौंदाणे रस्त्यावर  पुलावरील डांबर उखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 11:00 PM2018-02-21T23:00:31+5:302018-02-22T00:16:02+5:30

सौंदाणे रस्त्यावरील पिंपळगावाजवळ असलेल्या बिलओहळ नाल्यावरील पुलाचे काम पूर्ण होऊन वर्ष झाले. मात्र पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात न आल्याने सातत्याने अपघात होत आहेत. यात अनेकजण जखमी झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित डांबरीकरण करावे, अशी मागणी चालकांकडून केली जात आहे.

The bridge collapsed on the Saundate road | सौंदाणे रस्त्यावर  पुलावरील डांबर उखडले

सौंदाणे रस्त्यावर  पुलावरील डांबर उखडले

Next

देवळा : सौंदाणे रस्त्यावरील पिंपळगावाजवळ असलेल्या बिलओहळ नाल्यावरील पुलाचे काम पूर्ण होऊन वर्ष झाले. मात्र पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात न आल्याने सातत्याने अपघात होत आहेत. यात अनेकजण जखमी झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित डांबरीकरण करावे, अशी मागणी चालकांकडून केली जात आहे.  तालुक्यातील लोकप्रतिनिधी रोज याच रस्त्याने मार्गक्रमण करतात. मात्र त्यांनीही या गैरसोयीची दखल घेतली नसल्याबद्दल नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सौंदाणे, देवळा, कळवण, सुरगाणा, वघई या रस्त्यांवर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. गेल्या नोव्हेंबर महिन्यात या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती.  पिंपळगाव ( वा ) जवळील बिलओहळ नाल्यावरील पुलाचे काम वर्षभरापूर्वी पूर्ण झाल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले होते. त्यावेळी पुलावरील रस्त्यावर खडी टाकण्यात येऊन तात्पुरता रस्ता तयार करण्यात आला होता. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण केले नाही. त्यामुळे चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे.  सौंदाणे रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ असल्यामुळे पुलावरील रस्त्याची खडी उखडून गेली आहे. यामुळे पुलावरून वाहन चालवणे जिकिरीचे झाले आहे. खडी उघडी पडल्याने दगड उडून वाहनांच्या काचा फुटणे, टायर फुटले, पंक्चर होणे, अपघात होणे या घटना नित्याच्या झाल्या आहेत. अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. पुलालगतच्या परिसरात राहणाºया शेतकºयांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. तीन महिन्यांपूर्वीच रस्त्याच्या कडेने खडी टाकण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी वाहन चालक, रहिवाशांकडून केली जात आहे.


 

Web Title: The bridge collapsed on the Saundate road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.