फिल्टर हाउसला भगदाड
By Admin | Updated: July 23, 2014 00:30 IST2014-07-22T22:17:04+5:302014-07-23T00:30:12+5:30
इगतपुरी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पालिकेच्या तलावाच्या फिल्टर हाउसलाच भगदाड पडले आहे.

फिल्टर हाउसला भगदाड
इगतपुरी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पालिकेच्या तलावाच्या फिल्टर हाउसलाच भगदाड पडले आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सदरचे भगदाड बंद करण्यासाठी पत्रा लावला आहे. इगतपुरी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी २८ दलघफूचा साठवण तलाव असून, येथील संरक्षण भिंतीलगत आतल्या बाजूला जुने फिल्टर हाउस आहे. याच फिल्टर हाउसला भगदाड पडले असून, याबाबतची माहिती मिळताच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दोरखंडाने लोखंडी पत्रा बांधला आहे. सदरचे वृत्त कळताच ते पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. सदरचे काम तातडीने करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.