शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

वीरांच्या मिरवणुकीची परंपरा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 00:57 IST

होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी नाशिक शहरात धूलिवंदनाला सायंकाळी वीरांची सवाद्य मिरवणूक काढण्याची परंपरा यंदा खंडित झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाने सोमवारी सकाळी ते रात्रीपर्यंत गंगाघाट परिसरात संचारबंदी लागू केल्याने यंदा धूलिवंदनाच्या दिवशी वीरांची मिरवणूक दिसली नाही, तर परंपरा म्हणून केवळ गल्लीबोळात  सजलेले वीर होळीभोवती फेरा मारून घराकडे जातानाचे चित्र दिसून आले. 

ठळक मुद्देगंगाघाटावर शुकशुकाट : चौफेर पोलीस तैनात

पंचवटी : होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी नाशिक शहरात धूलिवंदनाला सायंकाळी वीरांची सवाद्य मिरवणूक काढण्याची परंपरा यंदा खंडित झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाने सोमवारी सकाळी ते रात्रीपर्यंत गंगाघाट परिसरात संचारबंदी लागू केल्याने यंदा धूलिवंदनाच्या दिवशी वीरांची मिरवणूक दिसली नाही, तर परंपरा म्हणून केवळ गल्लीबोळात  सजलेले वीर होळीभोवती फेरा मारून घराकडे जातानाचे चित्र दिसून आले. यंदा वीरांची मिरवणूक नसल्याने गंगाघाट परिसरात सर्वत्र शुकशुकाट पसरलेला असल्याचे दिसून आले. गंगाघाट आणि रामकुंड, गाडगे महाराज पटांगण भागात जागोजागी पोलीस बळ तैनात करण्यात आले होते. दरवर्षी धूलिवंदनाच्या दिवशी गंगाघाटावर शेकडो वीरांची गर्दी होते, तर भाविक शेकडोंच्या संख्येने उपस्थित असतात. मात्र, यंदा कोरोनामुळे वीरांच्या मिरवणुकीवर निर्बंध असल्याने प्रथमच गंगाघाटावर वीरांची मिरवणूक आली नसल्याचे बोलले जात आहे. रामकुंड परिसरात पंचवटी पोलिसांनी संपूर्ण परिसरात लोखंडी बॅरिकेड्‌स केले होते व पोलीस बळ तैनात करण्यात आले होते. मालवीय चौकातून नागरिक खाली रामकुंडाकडे जात होते. मात्र, बॅरिकेड्‌समुळे नागरिकांना पुढे जाता येत नव्हते. कोणी चुकून रामकुंडावर जाण्याचा प्रयत्न केला, तर बंदोबस्तासाठी नेमलेल्या पंचवटी पोलिसांकडून अत्यंत कडक शब्दात कानउघाडणी केली जात असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :NashikनाशिकHoliहोळी