शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

प्रवाशांअभावी बसच्या चाकांना ब्रेक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 22:51 IST

लॉकडाउनच्या काळात शासनाने बससेवा सुरू करण्यासाठी परवानगी दिल्याने दोन महिन्यांपासून थबकलेली बसची चाके दि. २२ मेपासून पुन्हा धावू लागली आहेत. या आदेशाने कोरोनामुळे कोट्यवधी रु पयांचा तोटा सहन केलेल्या एसटी महामंडळाला व कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असताना प्रवाशांअभावी बसच्या चाकांना तिसºयाच दिवशी ब्रेक लागला आहे.

ठळक मुद्देदोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर वाहतूक सेवा सुरू : पिंपळगाव बसवंत, येवला, पेठ आगारातच एस.टी. उभी

नाशिक : लॉकडाउनच्या काळात शासनाने बससेवा सुरू करण्यासाठी परवानगी दिल्याने दोन महिन्यांपासून थबकलेली बसची चाके दि. २२ मेपासून पुन्हा धावू लागली आहेत. या आदेशाने कोरोनामुळे कोट्यवधीरु पयांचा तोटा सहन केलेल्या एसटी महामंडळाला व कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असताना प्रवाशांअभावी बसच्या चाकांना तिसºयाच दिवशी ब्रेक लागला आहे.पिंपळगाव बस आगारकोरोनामुळे मार्चपासून एसटी महामंडळाची बससेवा बंद होती. लॉकडाउनच्या काळात पिंपळगाव बसवंत आगाराला अंदाजे साडेतीन कोटींचा फटका बसला आहे. परिणामी कर्मचाऱ्यांचे पगारदेखील रखडले आहेत. गेल्या आठवड्यात पिंपळगाव आगाराने ६ हजारांहून अधिक परप्रांतीय बांधवांना त्यांच्या राज्याच्या सीमेवर सोडण्यासाठी १५० बसेसची सेवा पुरवली. मात्र, सर्वसामान्यांना वाहतूक सेवा कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा होती. शासनाचे बससेवा सुरू करण्याचे आदेश प्राप्त झाल्याने निफाड, दिंडोरी, वणीकडे बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. मात्र प्रवासीच नसल्याने या बसेस दिवसभर स्थानकात उभ्या असलेल्या बघायला मिळत आहेत.पिंपळगाव आगारामधून सकाळी ७ वाजता पहिली बस सुटणार असल्याने आगारप्रमुख विजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड, दिंडोरी, वणी या मार्गावर जाणाºया बसेस सॅनिटाईज केल्या गेल्या. प्रवाशांना सुखकर सेवा देण्यासाठी बसेसची देखभाल करून सज्ज ठेवण्यात आल्या; मात्र सायंकाळी ७ वाजेपर्यंत एकही प्रवासी न आल्याने या बसेस पुन्हा आगारात नेण्यात आल्या.शासनाच्या सूचनेनुसार बससेवा सुरू झाली आहे. ही सेवा आंतरजिल्हा असून, सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत बसेस सुरु राहील. बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येणार असून, एका बसमध्ये फक्त २२ प्रवाशानांच प्रवेश दिला जाणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील सेवेसंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.- विजय निकम, आगारप्रमुख, पिंपळगावपेठ आगारातून आठ फेºयांतून ११४ प्रवाशांची वाहतूकपेठ : कोरोना ग्रीन झोनमध्ये स्थानिक बसवाहतुकीस परवानगी मिळाल्यानंतर पेठ आगारातून शुक्र वारपासून तीन बसेस सोडण्यात आल्या. मात्र प्रवाशांचा अल्पप्रतिसाद मिळाला. शुक्र वारी आठ फेºयांतून ८४, तर शनिवारी ११४ प्रवाशांनी लालपरीचा आधार घेतला. पेठ ते हरसूल हा नेहमीच जास्त प्रवासी असलेल्या मार्गावर बस सोडण्यात आली तसेच पेठ -घुबडसाका व पेठ-जाहुले या दोन बसेस सुरू करण्यात आल्या. सध्याचे लॉकडाउन व त्यामुळे बंद असलेले आठवडे बाजार यामुळे प्रवाशांचा अल्पप्रतिसाद मिळाल्याचे आगारप्रमुख स्वप्नील अहिरे यांनी सांगितले.४ येवला : येथील स्थानकातून सुरू झालेली बससेवा तिसºया दिवशीही प्रवाशांअभावी रद्द झाली. शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाबाधित आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर दोन बसेसच्या माध्यमातून सोळा फेºया करण्याचे नियोजन आगाराने केले आहे. येवला-नांदगाव, येवला-लासलगाव, येवला-निफाड, येवला-मनमाड अशा प्रत्येकी दोन म्हणजे एकूण आठ तर येऊन-जाऊन सोळा फेºया करण्याचे नियोजन आहे. मात्र, प्रवासीवर्गाच्या प्रतिसादाअभावी तिसºया दिवशीही या बसफेºया रद्द कराव्या लागल्या आहेत. एसटीची प्रवासी वाहतूक सुरू करण्याची घोषणा केली गेली असली तरी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लालपरीतून प्रवास करायच्या मन:स्थितीत नागरिक नसल्याचे दिसून येत आहे. प्रवाशांच्या मागणीप्रमाणे बसफेºया वाढविण्यात येतील, असे आगारप्रमुख प्रशांत गुंड यांनी सांगितले.लासलगाव आगाराची ‘लालपरी’ रस्त्यावरलासलगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउन जाहीर केल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून लासलगाव आगाराची बससेवा बंद होती. शुक्रवारपासून प्रवासाची गैरसोय होऊ नये म्हणून आंतरजिल्हा बससेवेत लासलगाव ते मनमाड, चांदवड आणि सिन्नर या गावांदरम्यान एसटीची लालपरी पुन्हा धावू लागली आहे. नाशिक, मालेगाव व कंटेन्मेंट झोन वगळता ग्रामीण भागात एसटी बस सुरू करण्यात आल्याने लासलगाव बसस्थानकातून सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मनमाडसाठी सकाळी १० वा, दुपारी ४ वाजता एसटी बस सुटणार आहे. चांदवडसाठी सकाळी ७.३० वा, दुपारी १ वाजता, तर सिन्नरसाठी सकाळी ८.३० वा व दुपारी १ वाजता बस सुटणार आहे. या बससेवेदरम्यान फिजिकल डिस्टन्सिंग राखत ५० टक्के प्रवासी वाहतूक केली जाणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBus Driverबसचालक