शहरात दोन तास होणार वीज खंडित

By Admin | Updated: July 26, 2014 00:51 IST2014-07-26T00:29:59+5:302014-07-26T00:51:06+5:30

शहरात दोन तास होणार वीज खंडित

Break the electricity will take two hours in the city | शहरात दोन तास होणार वीज खंडित

शहरात दोन तास होणार वीज खंडित

नाशिक : शहर तसेच ग्रामीण भागात तांत्रिक कामे करण्यात येणार असल्यामुळे जवळपास निम्म्या शहरात सकाळी ९ ते १० आणि सायंकाळी ४ ते ५ या वेळेत वीजपुरवठा खंडित होणार असल्याची माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली.
शहरातील पंचवटी, गंगाघाट, निमाणी, रामकुंड, नाग चौक, राणेनगर, पेठेनगर, चार्वाक चौक, कमोदनगर, वासननगर त्याचप्रमाणे मोहगाव, बाभळेश्वर, चांदगिरी, धामणगाव, साकूर या भागांतील वीजपुरवठा खंडित होणार आहे. त्याचप्रमाणे महापारेषणनेदेखील तांत्रिक कामे काढल्याने अंबड औद्योगिक वसाहत, बोरगड, वाडीवऱ्हे, सिन्नर, मालेगाव उपकेंद्रांवरील परिसरातील वीजपुरवठा सकाळी एक आणि सायंकाळी एक तास याप्रमाणे वीजपुरवठा खंडित राहणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Break the electricity will take two hours in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.