पाटोद्यात कोरोना लसीकरणाला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:23 IST2021-05-05T04:23:56+5:302021-05-05T04:23:56+5:30
अनेक नागरिकांची लसीची दुसरी मात्रा घेण्याची मुदत संपली आहे. त्यामुळे नागरिकांची घालमेल वाढली आहे. या ठिकाणी लस उपलब्ध करून ...

पाटोद्यात कोरोना लसीकरणाला ब्रेक
अनेक नागरिकांची लसीची दुसरी मात्रा घेण्याची मुदत संपली आहे. त्यामुळे नागरिकांची घालमेल वाढली आहे. या ठिकाणी लस उपलब्ध करून द्यावी व नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, मृत्युदरही वाढला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण आवश्यक बनले आहे. लसीकरणाबाबत विविध माध्यमामधून जनजागृती केली जात आहे. ग्रामीण भाग असूनही या ठिकाणी लसीकरणासाठी नागरिक सरसावले असून, प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. लसीकरणासाठी अनेक नागरिकांनी ऑनलाइन नाव नोंदणी केली आहे. मात्र गेल्या पाच - सहा दिवसांपासून लसच उपलब्ध झाली नसल्याने लसीकरण मोहिमेला ब्रेक बसल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
इन्फो
नागरिकांची शोधमोहीम
लसीचा पुरवठा होत नसल्याने पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे नागरिकांची सध्या लस शोधमोहीम सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. लस घेण्यासाठी पहिल्यांदा उदासीनता दिसून येत होती, आता मात्र प्रतिसाद मिळत आहे.