जिल्हा बँकेच्या सक्तीच्या वसुलीला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:26 IST2021-02-06T04:26:11+5:302021-02-06T04:26:11+5:30

कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेने व्यापक मोहीम सुरू केली आहे. कर्जदाराला नोटीस पाठविण्यात येत असून, मालमत्ता जप्तीची कारवाईदेखील केली जात ...

Break to compulsory recovery of District Bank | जिल्हा बँकेच्या सक्तीच्या वसुलीला ब्रेक

जिल्हा बँकेच्या सक्तीच्या वसुलीला ब्रेक

कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेने व्यापक मोहीम सुरू केली आहे. कर्जदाराला नोटीस पाठविण्यात येत असून, मालमत्ता जप्तीची कारवाईदेखील केली जात आहे. याबाबत शेतकरीवर्गाकडून तक्रारी केल्या जात होत्या. आर्थिक अडचणीत असतानाही वसुलीसाठीचा तगादा लावला जात असल्यामुळे अनेकांनी पालकमंत्र्यांकडे दिलासा देण्याची मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी सक्तीच्या वसुलीला हरकत घेत अशी मोहीम तत्काळ थांबविण्याचे आदेश दिले.

वसुलीसंदर्भात जिल्हा बँक अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची सूचना पालकमंत्री भुजबळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. सक्तीच्या वसुलीसंदर्भात शेतकऱ्यांनी अनेक तक्रारी केलेल्या आहेत. कोरोनाचे संकट आणि शेतमालाचे झालेले नुकसान यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. त्यामुळे यातून तोडगा काढण्यासाठी तत्काळ बैठक घेण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली.

Web Title: Break to compulsory recovery of District Bank