शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जैन मंदिरात धाडसी चोरी

By admin | Updated: August 5, 2016 22:22 IST

जैन मंदिरात धाडसी चोरी

 येवला : शहरातील मध्यवस्तीत भरदिवसा घडली घटनायेवला : शहरातील मध्यवस्तीत १३३ वर्षं पुरातन अवंती पार्श्वनाथ श्वेतांबर मंदिरात गुरुवारी अज्ञात चोरांनी मूर्तीच्या अंगावरील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे ६७ हजार ९०० रुपयांचा ऐवज घेऊन लांबविला. यामुळे शहराच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पटणी ट्रस्टचे अध्यक्ष विलास पटणी यांनी शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.येथील सराफ बाजाराजवळील जब्रेश्वर खुंट येथील जैन मंदिरात असलेल्या सुपार्श्वनाथ स्वामी, चंद्रानन स्वामी व वारीसेन मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. तीनही मूर्तींच्या कपाळावर लावण्यात आलेली सोन्याची कपाळपट्टी तसेच तीनही मूर्तींच्या डोक्यावर असलेले प्रत्येकी तीन असे एकूण नऊ चांदीचे छत्र, गाभाऱ्यासमोर लावण्यात आलेले चांदीच्या नारळाच्या आकाराचे तोरण असा ऐवज होता. मंदिराचे पुजारी रमेश रमासा मांडवगडे हे मंदिराचे सुमारे चार वर्षांपासून कामकाज पाहतात. पुजारी मांडवगडे हे दुपारी अडीच वाजेपर्यंत मंदिरातच होते. त्यानंतर त्यांनी मंदिराच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावून मंदिराचे उत्तर भागातील असलेला दरवाजा लोटून घरी गेले. त्या दरम्यान चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून गाभाऱ्याचा कोयंडा तोडून वरील सर्व ऐवज लंपास केला. पुजारी मांडवगडे हे सायंकाळी साडेपाचचे सुमारास मंदिरात आले तेव्हा त्यांना चोरी झाल्याची घटना लक्षात येताच त्यांनी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विलास जयंतीलाल पटणी यांना कळविले.मंदिरात चोरी झाल्याची खात्री पटल्यानंतर पटणी व समाजाचे इतर नागरिकांनी येवला शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना घटनेची माहिती कळविली. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बारहाते करीत आहेत. शुक्रवारी मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राहुल खाडे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. (वार्ताहर)