जैन मंदिरात धाडसी चोरी

By Admin | Updated: August 5, 2016 22:22 IST2016-08-05T22:22:40+5:302016-08-05T22:22:54+5:30

जैन मंदिरात धाडसी चोरी

The brave theft in the Jain temple | जैन मंदिरात धाडसी चोरी

जैन मंदिरात धाडसी चोरी

 येवला : शहरातील मध्यवस्तीत भरदिवसा घडली घटनायेवला : शहरातील मध्यवस्तीत १३३ वर्षं पुरातन अवंती पार्श्वनाथ श्वेतांबर मंदिरात गुरुवारी अज्ञात चोरांनी मूर्तीच्या अंगावरील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे ६७ हजार ९०० रुपयांचा ऐवज घेऊन लांबविला. यामुळे शहराच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पटणी ट्रस्टचे अध्यक्ष विलास पटणी यांनी शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
येथील सराफ बाजाराजवळील जब्रेश्वर खुंट येथील जैन मंदिरात असलेल्या सुपार्श्वनाथ स्वामी, चंद्रानन स्वामी व वारीसेन मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. तीनही मूर्तींच्या कपाळावर लावण्यात आलेली सोन्याची कपाळपट्टी तसेच तीनही मूर्तींच्या डोक्यावर असलेले प्रत्येकी तीन असे एकूण नऊ
चांदीचे छत्र, गाभाऱ्यासमोर लावण्यात आलेले चांदीच्या नारळाच्या आकाराचे तोरण असा ऐवज होता.
मंदिराचे पुजारी रमेश रमासा मांडवगडे हे मंदिराचे सुमारे चार वर्षांपासून कामकाज पाहतात. पुजारी मांडवगडे हे दुपारी अडीच वाजेपर्यंत मंदिरातच होते. त्यानंतर त्यांनी मंदिराच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावून मंदिराचे उत्तर
भागातील असलेला दरवाजा लोटून घरी गेले. त्या दरम्यान चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून गाभाऱ्याचा कोयंडा तोडून वरील सर्व ऐवज लंपास केला.
पुजारी मांडवगडे हे सायंकाळी साडेपाचचे सुमारास मंदिरात आले तेव्हा त्यांना चोरी झाल्याची घटना लक्षात येताच त्यांनी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विलास जयंतीलाल पटणी यांना कळविले.
मंदिरात चोरी झाल्याची खात्री पटल्यानंतर पटणी व समाजाचे इतर नागरिकांनी येवला शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना घटनेची माहिती कळविली.
या घटनेचा तपास
पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बारहाते करीत आहेत. शुक्रवारी मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राहुल खाडे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. (वार्ताहर)

Web Title: The brave theft in the Jain temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.