ब्राह्मणगाव येथे मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ
By Admin | Updated: August 26, 2016 21:54 IST2016-08-26T21:53:30+5:302016-08-26T21:54:19+5:30
ब्राह्मणगाव येथे मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ

ब्राह्मणगाव येथे मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ
ब्राह्मणगाव : गाव व परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढली असून, हे कुत्रे जनावरांसह नागरिकांना त्रास देत आहेत. विद्यार्थीही कुत्र्यांच्या दहशतीखाली आहेत.
गाव परिसरात मोकाटे कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, ग्रामस्थांना त्यांचा त्रास होत आहे तरी संबंधित खात्याने वेळीच लक्ष देऊन या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसे गावाजवळील शेतात उभ्या पिकांना गाढव, मोकाट शेळ्यांचा त्रास असून, पिकांचे नुकसान करत असतात. (वार्ताहर)