कुंभमेळा प्रवेशद्वाराच्या पितळी घंटा दोन वर्षांपासून गायबच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:17 IST2021-07-07T04:17:29+5:302021-07-07T04:17:29+5:30
पाच वर्षांपूर्वी पार पडलेल्या सिंहस्थ कुंभमेळा कालावधीत नाशिक महापालिकेने सिंहस्थनगरी प्रवेशद्वार आकर्षक दिसावे, यासाठी जनार्दन स्वामी आश्रमाकडून तपोवनकडे जाणाऱ्या ...

कुंभमेळा प्रवेशद्वाराच्या पितळी घंटा दोन वर्षांपासून गायबच
पाच वर्षांपूर्वी पार पडलेल्या सिंहस्थ कुंभमेळा कालावधीत नाशिक महापालिकेने सिंहस्थनगरी प्रवेशद्वार आकर्षक दिसावे, यासाठी जनार्दन स्वामी आश्रमाकडून तपोवनकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दगडी कमान उभारून कमानीवर २५ पितळी घंटा बसवून रामानंदाचार्य प्रवेशद्वार असे नामकरण केले होते. पण पालिकेने बसविलेल्या पितळी घंटांवर भुरट्या चोरट्यांची नजर पडली आणि चोरट्यांनी दोन पितळी घंटा चोरल्या होत्या. सव्वादोन वर्षांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी प्रवेशद्वार कमानीवर बसविलेल्या दोन पितळी घंटांवर डल्ला मारल्याचे लक्षात येताच, ही बाब काही नागरिकांनी मनपाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेऊन नवीन घंटा बसविण्याची मागणी करून निवेदन दिले होते.
या प्रवेशद्वारावर पुन्हा नव्याने पितळी घंटा बसविण्यासाठी मोठा खर्च नसला तरी, पालिका प्रशासन नव्याने पितळी घंटा बसविण्यास उदासीनता दाखवत असल्याने तसेच सत्ताधारी लोकप्रतिनिधीदेखील या विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याने रामानंदाचार्य प्रवेशद्वारावर पितळी घंटा बसविण्यात याव्यात, यासाठी मनपा आयुक्तांना निवेदन सादर करण्यात येणार आहे, असे सूर्यवंशी यांनी सांगितले.
(फोटो ०३ घंटा)