शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मेंदू-कानाच्यामध्ये होती गाठ : इजिप्तच्या महिलेवर नाशकात यशस्वी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 14:37 IST

नाशिक : ‘ग्लोमस जुगीलर’ नावाची गाठ (ट्यूमर) कान आणि मेंदूमध्ये उद्भवतो. इजिप्त देशातील ‘कैरो’ शहराच्या निवासी असलेल्या हनीम अलसईद ...

ठळक मुद्दे‘अ‍ॅकॉस्टिक न्यूरोमा’ नावाची शस्त्रक्रिया यशस्वीशस्त्रक्रियेनंतर या महिला रूग्ण पुर्णत: सामान्य शस्त्रक्रिया अत्यंत अवघड व गुंतागुंतीची होती. त्यामुळे मोठे आव्हान

नाशिक: ‘ग्लोमस जुगीलर’ नावाची गाठ (ट्यूमर) कान आणि मेंदूमध्ये उद्भवतो. इजिप्त देशातील ‘कैरो’ शहराच्या निवासी असलेल्या हनीम अलसईद फर्क ही महिला या आजाराने मागील काही महिन्यांपासून त्रस्त होती. इजिप्तमधील सर्व तज्ज्ञ डॉक्टरांनी या आजारावर उपचार करण्यास असमर्थता दर्शविली. या रूग्णाला अमेरिका व आॅस्ट्रेलियासारख्या देशांत जाण्याचा सल्ला दिला गेला; मात्र इजिप्तच्या एका डॉक्टर त्यांना नाशिकमध्ये असलेल्या कान-नाक घसा तज्ज्ञ डॉ. शब्बीर इंदोरवाला यांच्या रूग्णालयात आठवडाभरापूर्वी ते दाखल झाले. मुंबईनाका येथील रूग्णालयात त्यांच्यावर इंदोरवाला यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण चमूने अकरा तासांचे परिश्रम घेत गुंतागुंतीची व अत्यंत अवघड अशा जागेवर असलेलजया गाठीवर ‘अ‍ॅकॉस्टिक न्यूरोमा’ नावाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पुर्ण केल्याचे इंदोरवाला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे फर्क यांना अमेरिका, आॅस्ट्रेलियासारख्या देशांत महागडे उपचार करणे शक्य नव्हते. दरम्यान, इंदोरवाला यांच्या कार्यशाळेत प्रशिक्षण घेतलेल्या इजिप्तच्या डॉ.अन्वर यांच्या त्या संपर्कात आल्या. त्यांनी नाशिकचे इंदोरवाला यांचा पर्याय सुचिवला. फर्क या डॉ. इंदोरवाला यांच्या मुंबई नाका परिसरातील रु ग्णालयात उपचारासाठी मागील आठवड्यात दाखल झाल्या. अत्यंत गुंतागुंतीची आणि अवघड समजली जाणारी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी इंदोरवाला व त्यांच्या चमूला तब्बल ११ तास लागल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. शस्त्रक्रियेनंतर या महिला रूग्ण पुर्णत: सामान्य असून ते दोन दिवसांत इजिप्त या मायदेशी आनंदाने परतणार आहे.परदेशातील डॉक्टर, रूग्णांचा विश्वास सार्थ ठरविला आणि सांघिक प्रयत्नाने आलेले यश महत्त्वाचे आहे. डॉक्टरांनी इच्छाशक्ती व कौशल्याच्या अधारे आपल्या ज्ञान व अनुभवाच्या जोरावर रूग्णसेवा करण्यासाठी सातत्याने पुढाकार घेतल्यास यश नक्की मिळते. ही शस्त्रक्रिया अत्यंत अवघड व गुंतागुंतीची होती. त्यामुळे मोठे आव्हान आमच्यापुढे होते; मात्र ते अकरा तासांच्या प्रयत्नांअंती लीलयापणे पार पडल्याचे मत इंदोरवाला यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. अन्वर, डॉ. सुदर्शन अहिरे, प्रशासनधिकारी युसुफ पंजाब, आदि उपस्थित होते.

टॅग्स :Healthआरोग्यNashikनाशिक