कारागृहात प्रथमच ब्राह्मी लिपीचे धडे

By Admin | Updated: July 21, 2014 00:42 IST2014-07-20T22:38:22+5:302014-07-21T00:42:13+5:30

कारागृहात प्रथमच ब्राह्मी लिपीचे धडे

Brahmi script for the first time in the jail | कारागृहात प्रथमच ब्राह्मी लिपीचे धडे

कारागृहात प्रथमच ब्राह्मी लिपीचे धडे

 

नाशिक : ट्रिबल्स आणि नाशिकरोड कारागृह प्रशासन यांच्या वतीने कारागृहात प्रथमच ब्राह्मी लिपी प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात आला. अशा प्रकारचे प्रशिक्षण देणारे नाशिकरोड कारागृह देशातील पहिले कारागृह ठरले आहे.
ट्रिबल्स या पुरातन भाषा संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थेच्या वतीने कारागृहात उपक्रम राबविण्यात आला. तीनदिवसीय प्रशिक्षण शिबिरात ८० पुरुष कैदी आणि १५ महिला कैद्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षण शिबिराचा समारोप कारागृहाच्या सभागृहात पार पडला.
कलागुण, कौशल्य आणि शिक्षण याला चार भिंतींच्या आत कधीही कैद करता येत नाही. संधी मिळाली तर या सृजनशीलतेचा आविष्कार नेहमीच घडतो. अशी संधी बंदीबांधवांना कारागृहातून दिली जाते. त्यातून व्यक्त होणाऱ्या त्यांच्या भावना मनाला स्पर्श करणाऱ्या ठरतात, असे प्रतिपादन कारागृह उपअधीक्षक वैभव आगे यांनी केले. नाशिकरोड कारागृहातील हे प्रशिक्षण भारतातील पहिला प्रयोग असल्याचेही आगे म्हणाले.
कारागृह प्रशासनाने दाखविलेली तयारी आणि बंदीबांधवांनी तीन दिवसांत आत्मसात केलेली ब्राह्मी लिपी पाहून आत्तापर्यंत सदर लिपी शिकलेल्या तीन हजार विद्यार्थ्यांमध्ये कारागृहातील विद्यार्थी लक्षणीय ठरले, असे ट्रिबल्स संस्थेचे अतुल भोसेकर म्हणाले. कैद्यांनी ब्राह्मी भाषेत लिहिलेले सुविचार, राष्ट्रगीत आणि काढलेले चित्र पाहून त्यांच्यातील भावना संवेदनशील असल्याचेही भोसेकर म्हणाले.
यावेळी वरिष्ठ तुरुंग अधिकारी वसंत वानखेडे, तरुंग अधिकारी के. पी. भवर, गावित, तसेच ट्रिबल्स संस्थेचे सचिव चव्हाण, अभिनव लोखंडे, मैत्रयी भोसेकर, रेखा खरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Brahmi script for the first time in the jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.