शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

ब्राह्मणगाव : महालपाटणे रोड चौफुलीच्या मोरीवर कठडा नसल्याने अपघात सटाणा-मालेगाव रस्त्यावर वाहनचालकांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:11 AM

ब्राह्मणगाव : येथील एकलव्यनगर जवळील गिरणा डावा कालव्याच्या पुलावरील कठडा व सटाणा-मालेगाव रस्त्याला जोडणाऱ्या महालपाटणे चौफुलीजवळील पाटावरील पुलावर कठडे बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ठळक मुद्देगावांना जाण्यासाठी हा मार्ग सोयीस्कर सौंदाणे रस्त्यालगत साईबाबांची कुटिया

ब्राह्मणगाव : येथील एकलव्यनगर जवळील गिरणा डावा कालव्याच्या पुलावरील कठडा व सटाणा-मालेगाव रस्त्याला जोडणाऱ्या महालपाटणे चौफुलीजवळील पाटावरील पुलावर कठडे बसविण्याची मागणी माजी उपसरपंच अनिल खरे, सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण, अविनाश जोशी तसेच वाहनधारकांसह ग्रामस्थांनी केली आहे. येथील बसस्थानकापासून काही अंतरावर महालपाटणे चौफुली आहे. याच रस्त्याने गावातून जाऊन एकलव्यनगरजवळ गिरणा डावा कालव्याच्या पुलावरून अजमेर सौंदाणे, सटाणा, कºहे, तीर्थक्षेत्र दोधेश्वर, नामपूर या गावांना जाता येते. ब्राह्मणगाव येथून परिसरातील ग्रामीण भागातील गावांना जाण्यासाठी हा मार्ग सोयीस्कर तसेच अंतर कमी असल्याने परिसरातून येणारे वाहनधारक व शेतकरी या गावांना जाण्यासाठी येथील महालपाटणे रोड चौफुलीपासून ते गिरणा डावा कालव्याच्या पुलावरून जाणाºया रस्त्याचा वापर करीत असतात. महत्त्वाचे म्हणजे गावापासून चार किलोमीटर अंतरावर तीर्थक्षेत्र पहाडेश्वर महादेव मंदिर तसेच अजमेर सौंदाणे रस्त्यालगत साईबाबांची कुटिया आहे. या मंदिरात श्रावण महिन्यात व इतर दिवशी भाविक महादेव व साईबाबांच्या दर्शनासाठी जात असतात. तसेच बाहेरील दुचाकीस्वारांना परिसरातील गावांना जाण्यासाठी महालपाटणे चौफुली-जवळील मोरीवरील कठडा, तर एकलव्यनगरजवळील गिरणा डावा कालव्याच्या पुलावर नसलेला कठड्यामुळे वाहन चालविताना लक्षात येत नसल्याने त्या जागी अपघात होऊन वाहनधारक जखमी होत आहेत, तर काहींना होणाºया दुखापतीस सामोरे जावे लागत आहे.महत्त्वाचे म्हणजे परिसरातील अनेक शेतकरी नामपूर बाजार समितीत, तर काही शेतकरी उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल ट्रॅक्टरच्या साह्याने या रस्त्याने घेऊन जात असतात. ट्रॅक्टरने शेतमाल घेऊन जात असताना या गिरणा डावा कालव्याच्या पुलावरील कठडा तर त्याच रस्त्याने सटाणा-मालेगाव रस्त्याला जोडणारा महालपाटणे रोड चौफुलीच्या मोरीवर कठडा नसल्याने शेतकºयांना मोठी कसरत करावी लागत आहे. याविषयी संबंधित विभागाला एकलव्यनगरजवळील गिरणा डावा कालव्याच्या पुलावर कठडा, तर गावाच्या काही अंतरावर असलेल्या महालपाटणे रोड चौफुलीच्या मोरीवर कठडा बसविण्याची मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.